Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: प्रतिबंधित सुंगधित तंबाकु सह कार, दोन मोबाईल असा २१ लाखाचा मुद्देमाल जप्त
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
तंबाखू तस्करांवर गुन्हे शाखेच्या कारवाईत एका महिलेलाही अटक आमचा विदर्भ - दीपक शर्मा चंद्रपूर/वरोरा (दि. १४ मार्च २०२४) -         खात्रीशीर ग...

तंबाखू तस्करांवर गुन्हे शाखेच्या कारवाईत एका महिलेलाही अटक
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर/वरोरा (दि. १४ मार्च २०२४) -
        खात्रीशीर गोपनिय माहिती आधारे पो.स्टे. वरोरा परीसरात रात्रोगस्त करीत असता सूत्राच्या माहिती नुसार नागपुर मार्गाने गाडी क्र. एम.एच. ३४ सि.डी. ८५४० या पांढ-या रंगाच्या कार मध्ये महाराष्ट्र प्रतिबंधित केलेला सुगंधित तंम्बाकू (Aromatic tobacco banned in Maharashtra) चा मोठा साठा घेऊन चंद्रपुरच्या दिशेने अवैधरित्या विक्रीसाठी वाहतुक करीत आहे अश्या खात्रीशीर माहितीवरून नंदोरी टोल नाका ता. वरोरा येथे नाकाबंदी केली असता माहितीत मिळालेल्या वर्णना नुसार भर वेगात चंद्रपूरच्या दिशेने पांढऱ्या रंगाची कार आढळून अली सदर वाहनाची झडती घेतली असता किंमत ५,७७,६०० रु. चा शासनाने प्रतिबंधित केलेला सुंगधित तंबाकु व १५,५०,००० किमतीची आरोपीच्या ताब्यातील टोयोटा (Toyota) कंपनिची कार व दोन मोबाईल असा एकुण २१,२७,६००/- रुपये चा मुद्दे माल पंचासमक्ष जप्त करण्यात आला.

          सदर प्रतिबंधित सुगंधित हा शासनाने प्रतिबंधित केलेला असल्याने आरोपी यांनी अवैधरित्या विक्रीकरीता वाहतुक करीत असता मिळुन आल्याने आरोपी मुकेश नगिनभाई कातरानी (Mukesh Naginbhai Katrani) (४६), चालक व एक महीला दोन्ही रा. वार्ड क्र. ६ नेरी, दुर्गापुर ता. जि. चंद्रपुर यांचे विरुध्द पो.स्टे. वरोरा अप.क्र. /२०२४ कलम ३२८, १८८, २७२, २७३, ३४ भादंवी सह कलम ३० (२), २६ (२) (अ), ३, ४, ५९ (१) अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील कायदेशीर कारवाई करणेकरीता जप्त मुद्देमाल व आरोपी मुकेश नगिनभाई कातरानी, चालक व एक महिलेला पो.स्टे. वरोरा यांचे ताब्यात देण्यात आले.

        उपरोक्त कारवाई पोलीस अधिक्षक श्री. मुम्मका सुदर्शन (S.P.Mummaka Sudarshan), अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती. रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनाखाली पो. नि. महेश कोंडावार (P.I. Mahesh Kondawar) यांचे आदेशाने सपोनि मनोज गदादे सपोनि किशोर शेरकी यांचे गोपनिय माहीतीवरुन सपोनि गदादे, पोहवा धनराज करकाडे, स्वामीदास चालेकर, गजानन नागरे, अजय बागेसर, पोअं. प्रशांत नागोसे चापोहवा दिनेश अराडे स्थागुशा चंद्रपुर सायबर पोलीस स्टेशन चे पोअं उमेश रोडे पो.स्टे. वरोरा येथील मपोशि किर्ती ठेंगणे यांनी सापळा रचुन यशस्वीरीत्या कारवाई केली. 
(aamcha vidarbha) (warora) (chandrapur) (police) (lcb)


14 Mar 2024

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

Emoticon
:) :)) ;(( :-) =)) ;( ;-( :d :-d @-) :p :o :>) (o) [-( :-? (p) :-s (m) 8-) :-t :-b b-( :-# =p~ $-) (b) (f) x-) (k) (h) (c) cheer
Click to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.

 
Top