Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: भाजपा चंद्रपूर जिल्हा ग्रामीण ची गाव चलो अभियान कार्यशाळा संपन्न
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - राजेश अरोरा बल्लारपूर (दि. ३० जानेवारी २०२४) -         भाजपा चंद्रपूर जिल्हा ग्रामीण ची गाव चलो अभियान कार्यशाळा संपन्न झाली. ...

आमचा विदर्भ - राजेश अरोरा
बल्लारपूर (दि. ३० जानेवारी २०२४) -
        भाजपा चंद्रपूर जिल्हा ग्रामीण ची गाव चलो अभियान कार्यशाळा संपन्न झाली. या अभियानाचे प्रभारी विधान परिषद सदस्य प्रवीण दटके यांनी विस्तार पूर्वक विषय मांडला. बैठकीचे समापन आमचे मार्गदर्शक नेते माननीय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले तसेच ओबीसी आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहिर यांनी समायोजित मार्गदर्शन केले. यावेळी मंचावर जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, देवराव भोंगळे, संजय गजपुरे, सौ विद्याताई देवडकर, श्रीमती संध्याताई गुरनुले, विजय राऊत, सुदर्शन निमकर, अशोक जीवतोडे, रमेश राजूरकर, नामदेव डाहुले, ब्रीजभूषण पझारे, विवेक बोडे, सौ वंदनाताई शेंडे, अनिल डोंगरे, आशिष देवतडे, महेश देवकाते इत्यादी मान्यवर होते. कार्यशाळे चे संचालन डॉक्टर मंगेश गुलवाडे यांनी केले तसेच कार्यशाळेची सांगता राष्ट्रगीताने झाली. कार्य शाळेत मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. (aamcha vidarbh) (chandrapur) (ballarpur)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top