Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कोरपना तालुक्यातील 'मोहन' पहिल्याच प्रयत्नात पीईटी परीक्षा उत्तीर्ण
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत कोरपना (दि. ८ डिसेंबर २०२३) -         गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली तर्फे घेण्यात आलेल्या पीईटी परीक्षेचा निकाल...

आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत
कोरपना (दि. ८ डिसेंबर २०२३) -
        गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली तर्फे घेण्यात आलेल्या पीईटी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून यामध्ये ग्रामीण भागातील समाज कार्यची आवड असलेला कोरपना तालुक्यातील कोठोडा बुज येथील मोहन विलास चुकाबोटलावर यांनी पहिल्याच प्रयत्नात सुयश मिळविले आहे. मोहनने व्यावसायिक समाजकार्य या विषयात पीईटी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. गोंडवाणा विद्यापीठाकडून घेण्यात आलेल्या पीएचडी प्रवेशासाठी प्रवेश चाचणी म्हणून पीईटी परीक्षेत यश संपादन केले. कोठोडा बूज या गावातून पेट परीक्षा उत्तीर्ण होणारा हा पहिला विद्यार्थी आहे. त्याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. मोहनने त्याचे यशाचे श्रेय आई-बाबा, नातेवाईक, मार्गदर्शक, गुरूवर्य आणि मित्र परिवाराला दिले आहे. (Educational) (Korpana) (aamcha vidarbha)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top