Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author We publish the news of Vidarbha level prominently on our website. If you are interested in doing digital journalism then you can join us. We also work for our advertisers to reach their advertisements to thousands of readers every day. any suggestion please message this mobile number 9975977378 email - samarthbharat3@gmail.com
Title: जिवतीत शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कार्यालय सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याचे केंद्र ठरेल - भरत बिरादार आमचा विदर्भ - दीपक शर्मा  जिवती (दि. ११ डिसेंबर २०२३) -         राज...

कार्यालय सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याचे केंद्र ठरेल - भरत बिरादार
आमचा विदर्भ - दीपक शर्मा 
जिवती (दि. ११ डिसेंबर २०२३) -
        राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जिल्ह्याचे संपर्क प्रमुख किरण पांडव, गंगाधर बडुरे, जिल्हा प्रमुख बंडू हजारे यांच्या आदेशाने शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन पार पडले. तालुक्यातील जनतेला व शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी तसेच शासकीय कार्यालय, योजना व दवाखान्यात येणाऱ्या सर्वसाधारण लोकांना अडचणीचा सामना करावा लागतो व त्यांना योग्य ती माहिती मिळत नाही त्यासाठी त्यांना योग्य ती माहिती तत्काळ मिळावी आणि तातडीने लोकांच्या समस्या  दूर व्हाव्या याकरिता जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन शिवाजी वाघमारे, लक्ष्मण तोगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. (Chief Minister Eknath Shinde) (shivsena)

        तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला वेळोवेळी विविध समस्यांना तोंड द्यावे लागते व अडचणीचा सामना करावा लागतो, जनसंपर्क कार्यालयात येऊन सर्वसामान्य लोक आपल्या समस्या मांडू शकणार आहे, हे कार्यालय सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याचे केंद्र ठरेल असा विश्वास शिवसेना तालुका प्रमुख भरत बिरादार यांनी व्यक्त केला. यावेळी तालुका संघटक गणेश पवार, भालेराव, दगडू मोतेवड, रमेश मेश्राम, मोहन आत्राम, ज्ञानेश्व, गुरु छपरे, राकेश राठोड व शेकडो शिवसैनिक उपस्थित होते. (jivati) (aamcha vidarbha)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top