Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: चक्क विना नंबर ची ट्रॉली आणि ट्रैक्टरने होत आहे अवैध रेती व्यवसाय
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
नांदा गडचांदूर परिसरात विना टीपी चा माल विकून रेती तस्कर करीत आहे लाखोची कमाई तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना माहिती देऊनही नाही होत कारवाई अवैध क...

नांदा गडचांदूर परिसरात विना टीपी चा माल विकून रेती तस्कर करीत आहे लाखोची कमाई
तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना माहिती देऊनही नाही होत कारवाई
अवैध काळ्या रेतीचा शासकीय कामात होत आहे सर्रास वापर
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी
कोरपना (दि. १२ डिसेंबर २०२३) -
        तालुक्यातील नदी घाट लिलाव न झाल्याने बंद असल्या मुळे रेतीची मागणी वाढू लागली आहे. याचाच फायदा घेत नांदा - गडचांदूर महसूल विभागात अवैध रेती व्यवसायिक सक्रिय झाले असून दुसऱ्या तालुक्यातील रेतीचा अवैध साठा करून दिवसा ढवळ्या सर्रास विकल्या जात असल्याने परिसरात या अवैध रेती वाहतुकीचा धंदा जोमात सुरू असल्याचे दिसून येत आहे. (Sand smugglers are earning lakhs by selling goods without TP in Nanda Gadchandur area)

        नांदाफाटा-गडचांदूर महसूल विभागात सिमेंट कारखान्याने भरभराटीस आला असल्याने मोठ्या प्रमाणावर औद्योगीकरण वाढले आहे. गडचांदूर, नांदाफाटा, कवठाळा, उपरवाही ही गावे वाढतच चालली आहे. त्यामुळे या गावात बारमाही रेतीची मागणी असल्याने रेतीचे भाव आभाळाला टेक ले असून तब्बल 7000 ते 8000 रू वसूल केल्या जात आहे. अवैध रेती व्यवसायिक सक्रिय होवून चक्क विना नंबर ची ट्रॉली आणि ट्रैक्टरचा वापर होत आहे. अवैध रेतीची वाहतूक करून लाखो रुपयांची कमाई केल्या जात आहे तरी पुलिस आणि महसूल विभागाचे अधिकारी मुद्धाम कानाडोळा करीत आहे. तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना या रेती चोरीची अनेक लोकांनी माहिती देऊनही कारवाई यावर कारवाई होत नसल्याने हे अधिकारी सरकारी नोकर आहे की रेती तस्कारांचे, स्थानीय नागरिकांना हे मोठे प्रश्न पडत आहे. 

        तालुक्यात रेती घाट लिलाव न झाल्याने अवैध रेती व्यासायिक दुसऱ्या तालुक्यातून रात्रौला विना टी.पी ची रेती हायवा बोलावून आपल्या ठिकाणावर जमा करतात व ती ट्रॅक्टर द्वारे मोठ्या दराने विकल्या जात आहे. दिवसा ढवळ्या रेती विकल्या जात असली तरी मंडळ अधिकारी व तलाठी मुददम डोळेझाक करतांना दिसून येत आहे.

        विशेष म्हणजे हे रेतीचे ढिगार वाहतुकीच्या मुख्य रोडकाठीच असून सामान्य जनतेचा निदर्शनास येत असले तरी मंडळ अधिकारी व तलाठी यांचा निदर्शनास का येत नाही हे सुद्धा नवलच वाटते. महसूल अधिकारयांना  या अवैध धंद्याची माहिती फोन द्वारे माहिती देऊनही ही ' आम्ही कारवाई करू ' असे बोलून उलट रेती चोरांना मदत करत असल्याचे दिसून येत आहे. पटवारी, मंडळ अधिकारी, तहसीलदारांना माहिती देऊन ही कोणतीच कारवाई होत नाल्याने महसूल अधिकाऱ्यांना अवैध रेती व्यावसायिक हे दर महिन्याला रसद तर पुरवित  नाही ना अशी जनमानसात चर्चा होत आहे. काही दिवसा पूर्वी नोकारी येथील कोतवाल ने एक रेतीने भरलेल्या ट्रैक्टरला पकडून मोठी रकम वसूल केल्याची चर्चा गावातील व्हाट्सअप ग्रुपवर रंगल्या आहे, तरी पण प्रशासन काहीच कारवाई करताना दिसत नाही. 

        अवैध रेती व्यावसायिक  ठेकेदारांना नाल्याची काळी रेती पुरवीत असल्याने हेच अवैध काळी रेती रस्ते बांधकाम, नाली बांधकाम, टाकी बांधकाम अशा विविध शासकीय कामात देखील वापर होताना दिसून येत आहे. चंद्रपूर जिल्ह्यतिल वरिष्ठ पोलिस आणि महसूल विभागाचे अधिकारी या तस्करांवर कारवाई करण्याची हिम्मत करतील की नाही किंव्हा हा रेती चोरीचा प्रकार असाच सुरू राहिल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (korpana) (aamcha vidarbha)
मिळालेल्या माहितीवर तलाठी यांचे कडून होत असलेल्या साठ्याची माहिती घेऊन पुढील करवाई करण्यात येईल 
किशोर उईके, मंडळ अधिकारी नांदा

शासकीय कामासाठी उत्तम काळी रेतीचा वापर केल्यास काही हरकत नाही. ठेकेदार रेती कुठून आणतो, कशी आणतो याच्याशी आमचे काही देणे घेणे नाही. 
अविनाश लोडे, सहायक अभियंता, पं स. कोरपना

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top