Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: सावलहिरा येथे विर भगवान बिरसामुंडा जयंती मोठ्या उत्साहात साजरी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी गडचांदूर (दि. १५ नोव्हेंबर २०२३)         तालुक्यातील सावलहिरा येथील आदिवासी गावात वीर भगवान...

आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी
गडचांदूर (दि. १५ नोव्हेंबर २०२३)
        तालुक्यातील सावलहिरा येथील आदिवासी गावात वीर भगवान बिरसामुंडा जयंती मोठ्या उत्साहात रॅली काढून ढोल ताशाच्या गजरात, महिला-पुरुषांनी नाचत गाजत मोठ्या हर्शोउल्हासात गावात रॅली काढण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तर मुख्य मार्गदर्शक पुंजाराम कोवे भाजपा आदिवासी नेते, प्रमुख पाहुणे उमेश पेंदोर सरपंच, वसंतराव बाहिर भाजपा नेते, संतोष जोगी उपसरपंच, रामदास ठाकरे तंटामुक्त अध्यक्ष, विनोद नागोसे पोलिस पाटील, लक्ष्मन पेंदोर, मारोती गेडाम, शत्रूघन कोवे, सुनिल गेडाम, यशोदा चायकाटे, रत्नमाला पेंदोर, अर्चना बहिरे, मानकु मडावी, गिरीधर अलाम, विठ्ठल मडावी, सुधाकर कोवे आदी मान्यवर उपस्थित होते. विर बिरसामुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण श्री पुंजाराम कोवे भाजपा आदिवासी नेते यांनी केले. तसेच तालुका अध्यक्ष नारायण हिवरकर यांनी प्रतिमेचे पूजन, ध्वजारोहण करून अभिवादन केले. पुंजाराम कोवे यांनी आपल्या मनोगतात विर भगवान बिरसामुंडा यांच्या जीवनावर माहिती दिली व त्यांनी आदिवासी समाजासाठी मोलाचे योगदान दिले अशा भावना व्यक्त केल्या तसेच तालुका अध्यक्ष नारायण हिवरकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विर भगवान बिरसामुंडा यांचा जन्म एका गरीब कुटुंबात 15:11:1875 रोजी झारखंड येथील अलीहाटु या छोट्याशा गावात झाला त्यांचं जीवन लहान पणा पासून फिरन्यात गेले त्यांना सावकार, जमिनदार, ब्रिटिश सरकारने आदिवासी जनतेवर केलेले अन्याय अत्याचार सहन झाले नाही त्यांनी ब्रिटिशांना धडा शिकविण्यासाठी बंड पुकारले व लढा दिला व आदीवासी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी जिवनभर लढा दिला व आदिवासी जनतेला न्याय मिळवून दिल्याच्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाला गावातील नागरिक, महिला, पुरुष व नवयुवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश पेंदोर यांनी केले तर आभार शत्रूघन कोवे यांनी मानले. (ballarpur) (aamcha vidarbha)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top