Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: अल्ट्राटेक कंपनी विरोधात आमरण उपोषण सुरू
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
ग्रापं सदस्य रत्नाकर चटप व उपसरपंच बाळकृष्ण काकडे उपोषणाला बसले काय आहे प्रमुख मागण्या..??  वाचा सविस्तर....! आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत...

ग्रापं सदस्य रत्नाकर चटप व उपसरपंच बाळकृष्ण काकडे उपोषणाला बसले
काय आहे प्रमुख मागण्या..??  वाचा सविस्तर....!
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी
गडचांदूर (दि. १६ नोव्हेंबर २०२३) -
        दत्तक गावांसाठी सी.एस.आर. मार्फत खर्च केल्या जाणारी निधी इतरत्र वळवून वाटेल त्या पद्धतीने खर्च करण्याचा आरोप करीत दत्तक सरपंच संघटना तर्फे आज दि. 16 /11/2023 ला रत्नाकर चटप ग्रा.प. सदस्य व बाळकृष्ण काकडे उपसरपंच आवाळपुर यानी आमरण उपोषणाला सुरवात केली आहे. (Gram Panchayat members Ratnakar Chatap and Upsarpanch Balkrishna sat on fast)

        कोरपना तालुक्यातील नांदा, अवारपुर, नोकारी, पालगाव या गावातील जमिनिवर उभी असलेली अल्ट्राटेक सिमेंट कंपनी, अवारपुर ने आवाळपूर, नांदा, बीबी हिरापूर सांगोडा, पालगाव, नोकारी, बाखर्डी, तडोधी, भोयेगाव ही गावे दत्तक घेतलेली आहे. मागील 40 वर्षापासून कंपनीचा कारखाना कार्यरत आहे. मात्र सन २०२० ते २०२३ या सत्रामध्ये कंपनी प्रशासन सदर दत्तक गावांमध्ये सी एस आर निधी खर्च करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत असल्याचा आरोप या सर्व गावातील सरपंचानी लावला आहे. या उद्योगामुळे गावातील लोकांना सुविधा होण्यऐवजी  उलट येथील रहीवासियांच्या आरोग्य, पाणी आणि मूलभूत सुविधांचा प्रश्न निर्माण झाला आहे. कंपनीच्या प्रदूषण तसेच ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्त्याची अवस्था बिकट झालेली असून अपघाताचे प्रमाणही वाढत चाललेले आहे. याबाबत दत्तक गावातील सरपंच उपसरपंच सदस्यांनी कंपनी प्रशासनाकडे विविध विकास कामांची मागणी केली. (Ultratech Cement Company)

        मात्र कंपनी याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करित असून दत्तक गावांसाठी सी. एस. आर. मार्फत खर्च केल्या जाणारी निधी इतरत्र वळवून वाटेल त्या पद्धतीने खर्च करीत असुन मुजोरीची भूमिका घेत असल्याचे चित्र आहे. यामुळे दत्तक गावांचे विकास रखडले ज़ात आहे. दत्तक गावातील सर्व सरपंच, उपसरपंच, सदस्यांनी कंपनी प्रशासन विरोधात सदर मागणी करत आंदोलन पुकारले आहे. सी.एस.आर. निधी उपलब्ध करून द्यावा या करीता तिन दिवस साखळी उपोषण करुनही काहीच तोडगा निघत नसल्याने आज दि. 16/11/23 ला कंपनी विरोधात मुंडन करुन आमरण उपोषण सुरू करण्यात आली आहे. 

काय आहे प्रमुख मागण्या..?? 
  1. अल्ट्राटेक सिमेंट कंपनी आवाळपूर तथा माणिकगड गडचांदूर येथून होणारी लाईम स्टोनची वाहतूक तात्काळ थांबवावी.
  2. सी. एस. आर. निधी दत्तक गावांना मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात यावा.
  3. दत्तक गावातील स्थानिक बेरोजगारांना रोजगार द्यावा.
  4. कंत्राटी कामगारांना देण्यात येणारा दिवाळी बोनस मध्ये तात्काळ वाढ करावी.
  5. कंपनीचा सी. एस. आर. निधी हा ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना विचारात घेऊन खर्च करावा. त्यासाठी विकास कामांचा वार्षिक आराखडा तयार करावा. परस्पर निधी खर्च करण्यात येऊ नये.
  6. परिसरातील आय. टी. आय. पास विद्यार्थ्यांना अप्रेंटिस करिता तात्काळ भरती करावी.
  7. गावातून शेताकडे जाणाऱ्या पांदन रस्त्याचे कंपनी मार्फत खडीकरण करावे.
  8. दत्तक गावातील पदवीधर व पदविका (अभियांत्रिकी) यांना किमान ४ वर्षाचे मानधन तत्वावर प्रशिक्षण देण्यात यावे. 

        या आंदोलनात नांदा येथील सरपंच मेघा नरेश पेंदोर, ग्रा.पं. सदस्य रत्नाकर चटप, प्रा. आशिष देरकर उपसरपंच बिबी, प्रियंका दिवे सरपंच आवारपुर, बालाकृष्णा काकडे उपसरपंच अवारपुर, अरुण रागीट सरपंच बाखर्डी, सुनिता तुमराम सरपंच हिरापूर, संजना सचिन बोन्डे, सरपंच सांगोडा, शालीनीलाई बोन्डे सरपंच भोयेगाव, ज्योती जेनेकर सरपंच तलोधी, संगिता झित्रु मडावी सरपंच नोकारी, ज्योती धोटे उपसरपंच सागोडा, अरुण काळे उपसरपंच हीरापुर, निर्मला मरस्कोल्हे सरपंच कढोली, आशा खासरे, मंगला गायकवाड, सुजाता चौधरी, सुनिता आत्राम, जयश्री ताकसांडे, सुष्मा गेडाम सदस्या नांदा, माया मडावी, संतोषी माहुलीकर सदस्या पालगाव आदि ग्रा पं पदधिकारयांनी उपोषणस्थळी पोहचून आपले समर्थन दिले आहे. (aawarpur) (gadchandur) (aamcha vidarbha)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top