Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या जन्मदिनानिमित्त दूध वाटप
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी गडचांदूर (दि. १३ नोव्हेंबर २०२३) -         राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्री...

आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी
गडचांदूर (दि. १३ नोव्हेंबर २०२३) -
        राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात भाजपा युवा नेते निलेश ताजने (BJP youth leader Nilesh Tajne) आणि नगरसेवक रामसेवक मोरे (Ramsevak More) यांच्या विशेष नेतृत्वाखाली दुध वाटप करण्यात आले. अहिर याना भविष्यातील राजकीय वाटचाली करिता शुभेच्छा देण्यात आल्या, यावेळी शेकडो लोकांनी दुधाचा आस्वाद घेतला. त्यानंतर भाजयुमो चे सदस्यांनी देशाचे पंतप्रधान यांच्या स्वच्छ भारत अभियानाचा संकल्प मनात ठेवून काही लोकांनी इतरत्र फेकलेले दुधाचे रिकामे ग्लास उचलून परिसर स्वच्छ केला. (Hansraj Ahir Birthday)

        कार्यक्रमाच्या याशस्वितेकरिता भाजप शहर अध्यक्ष सतीश उपलेंचवार, शहर महामंत्री हरिभाऊ घोरे, भाजप जेष्ठ नेते शिवाजी सेलोकार, महादेव एकरे, गंगाधर खंडाळे, संदिप शेरकी, शिंगरू काका, हितेश चव्हाण, महेश घरोटे, शंकर आपुरकर, गणपत बुरडकर, शिरीष बोगावर, भाजयूमो तालुका अध्यक्ष रोहन काकडे, अजीम बेग, कृणाल पारखी, सुयोग कोंगरे, इम्रान पाशा, हरी कुसळे, विक्की मेळावार, अभिजित शेंडे त्याचबरोबर फ्रेंड्स ऑफ बिजेपी चे प्रतीक सदनपवार, उत्कल बोढे, निखिल मोरे, दिवाकर नावडे, संजय राठोड, धवल घोरे, रोहित दुरतकर, राहुल पोद्दार, खन्ना गोंडे, अक्षय मेंढी, मयूर पोटदुखे, सुरज कंनाके, देवकते यांची उपस्थिती होती. (gadchandur) (aamcha vidarbha)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top