Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: चनाखा गावात भरदिवसा दीड लाखांची चोरी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. २८ ऑक्टॉबर २०२३) -         विरूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चनाखा ...

अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. २८ ऑक्टॉबर २०२३) -
        विरूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चनाखा गावात भरदिवसा दीड लाख रुपयांची चोरी झाल्याने गावात खळबळ माजली आहे. दिनेश रामटेके यांचे चनाखा गावात विहिरगाव रोडवर घर आहे. 26 ऑक्टोबर रोजी दिनेश हा शेतीसाठी मोटारपंप घेण्यासाठी मूल येथे गेला होता. त्यांची पत्नी घराला कुलूप लावून शेतात गेली. घराला कुलूप असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश करून कपाटातील एक लाख रुपये रोख व सोन्याचे दागिने असा एकूण दीड लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. दिनेशची मुलगी घरी आल्यावर हा प्रकार उघडकीस आला. विशेष म्हणजे याआधीही त्यांच्या घरातून कापूस चोरीला गेला होता. चोर गावातीलच रहिवासी असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. भरदिवसा चोरीच्या घटनेने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घरमालक दिनेश रामटेके यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास विरुर ठाण्याचे ठाणेदार जयप्रकाश निर्मल व पोलीस करीत आहेत. (wirur station) (rajura) (aamcha vidarbha)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top