Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: स्थानिक भूमिपुत्र बेरोजगारांसाठी मनसे तालुका अध्यक्ष आदित्य भाके आक्रमक
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
हर्षा पॉवर लिमिटेड येथे जिल्हाध्यक्ष मंदीप रोडे यांच्या नेतृत्वात धडक आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. २८ ऑक्टॉबर २०२३) -         महाराष...

हर्षा पॉवर लिमिटेड येथे जिल्हाध्यक्ष मंदीप रोडे यांच्या नेतृत्वात धडक
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. २८ ऑक्टॉबर २०२३) -
        महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीच स्थानिक बेरोजगारांचा प्रश्न घेऊन आंदोलन करण्यात अग्रेसर राहीली आहे. जवळपास सहा महिन्यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून हर्षा पॉवर लिमिटेड कंपनी साखरी येथे स्थानिक बेरोजगारांना रोजगार देण्यात यावा याकरिता निवेदन देण्यात आले होते. (Strike led by District President Mandeep Rode at Harsha Power Limited)

        आज सहा महिन्याचा मनसे चा अल्टिमेट संपल्यावर मनसे जिल्हाध्यक्ष मंदीप रोडे (mandip rode) यांच्या नेतृत्वात राजुरा तालुका अध्यक्ष आदित्य भाके (aaditya bhake) यांनी बेरोजगारांना घेऊन हर्षा कंपनी येथे धडक दिली आणि स्थानिक बेरोजगारांना त्वरित रोजगार देण्यात यावा याकरिता आक्रमकपणे चर्चा करण्यात आली, अन्यथा कंपनी काम बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हाध्यक्ष मंदीप रोडे यांनी दिला. यावेळी तालुका अध्यक्ष आदित्य भाके, तालुका उपाध्यक्ष मारोती मेश्राम, रोहित बत्ताशंकर, शहर अध्यक्ष कित्तू मेडपल्लिवार आदी मनसे कार्यकर्ते उपस्थित होते. (rajura) (aamcha vidarbha)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top