Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: महाराष्ट्र राज्य वीज कंत्राटी कामगार संघ चंद्रपूर सर्कलचे पदाधिकारी जाहीर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - अनंता गोखरे चंद्रपूर (दि. ११ ऑक्टॉबर २०२३) -         महावितरण विभागीय सर्कल अंतर्गत चंद्रपूर, बल्लारपूर व वरोरा उपविभागामध्ये ...

आमचा विदर्भ - अनंता गोखरे
चंद्रपूर (दि. ११ ऑक्टॉबर २०२३) -
        महावितरण विभागीय सर्कल अंतर्गत चंद्रपूर, बल्लारपूर व वरोरा उपविभागामध्ये रिक्त पदांवर कंत्राटी कामगार म्हणून तंत्रज्ञ व उपकेंद्र सहायक या पदावर कार्य करणारे तसेच नियमित कर्मचाऱ्याच्या खाद्य ला खांद्या लावून काम करणारे बाह्य स्त्रोत कंत्राटी कामगार यांची बैठक ९ आॅक्टोंबर रोज सोमवारला भारतीय मजदूर संघ चंद्रपूर कार्यालयात बैठक पार पडली. 

        बैठकीला महाराष्ट्र राज्य वीज कंत्राटी कामगार संघाचे जिल्हा अध्यक्ष हेमराज गेडे यांचेसह भारतीय मजदूर संघ चंद्रपूरचे अध्यक्ष प्रमोद येलचलवार यांच्या उपस्थितीत चंद्रपूर सर्कल तसेच डिव्हीजन चे पदाधिकारी यांची पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन नियुक्ती करण्यात आली. 

        यामध्ये चंद्रपूर सर्कल अध्यक्ष अंकुश डोंगरवार, वरोरा डिव्हीजन उपाध्यक्ष जितेंद्र काळे, मिथुन गायकवाड (बल्लारपूर), भारत वराटकर (चंद्रपूर), चंद्रपूर सर्कल संघटक सचिव स्वप्निल तराळे, सर्कल प्रसिद्धी प्रमुख सचिन पुसदेकर, डिव्हिजन सचिव विकास डोंगरे (वरोरा), दिपक उमरगुंडावार (बल्लारपूर), डिव्हीजन सहसचिव दिलीप भगत (वरोरा), नितीन महाकुलकर (बल्लारपूर), यांचेसह डिव्हीजन कार्यकारिणी सदस्य म्हणून महादेव सिडाम (वरोरा), रमाकांत उरकुडे (बल्लारपूर) यांची निवड करण्यात आली. 

      याप्रसंगी नवनिर्वाचित चंद्रपूर सर्कल अध्यक्ष यांनी संपूर्ण नवनिर्वाचित पदाधिकारी यांना पुढील वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या. यावेळी महावितरण विभागात बाह्य स्त्रोत यंत्रचालक व तंत्रज्ञ बरेच संख्येने उपस्थित होते. (Chandrapur) (aamcha vidarbha)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top