Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author We publish the news of Vidarbha level prominently on our website. If you are interested in doing digital journalism then you can join us. We also work for our advertisers to reach their advertisements to thousands of readers every day. any suggestion please message this mobile number 9975977378 email - samarthbharat3@gmail.com
Title: राजुरा-रामपूर लगतच्या माथरा जंगलात युवकाची निर्घृण हत्या
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
Breaking News आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. १० ऑक्टॉबर २०२३) -         येथील मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या रामपुर गावातील ...

Breaking News
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. १० ऑक्टॉबर २०२३) -
        येथील मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या रामपुर गावातील एका २८ वर्षीय युवकाची दगडाने ठेचून निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. या घटनेने खळबळ माजली असून गुन्हेगारी ने डोके वर काढल्याचे स्पष्ट होत आहे. संदीप देवराव निमकर असे मृत युवकाचे नाव आहे.

        रामपुर गावात संदीप निमकर हा आपल्या आई वडिलांसह राहत होता. (दि. ९) रोज सोमवारला रात्री आठ वाजता घरून निघून गेला तेव्हापासून तो बेपत्ता असल्याची तक्रार घरच्यांनी पोलिस ठाण्यात दिली. तोपर्यंत नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र तपास सुरू ठेवला होता. तो मित्रांसोबत जात असलेल्या ठिकाणी नातेवाईक शोधत असताना रामपुर लगत असलेल्या जंगलात माथरा रोड जवळ शोध घेत असताना झुडपात छिनविछिन अवस्थेत त्याचा मृतदेह पडलेला दिसून आला. घटनेची माहिती राजुरा पोलिस स्टेशन ला दिली असता राजुरा पोलिस स्टेशनचे ठाणेदार योगेश पारधी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. यावेळी यावेळी अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश साखरे उपस्थित राहून घटनेचा पंचनामा करून समोरील तपास राजुरा पोलिस करीत आहे.

        राजुरा लगत असलेल्या रामपुर या वस्तीत मागील काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. यापूर्वी राजुरा शहरातील नाका नंबर तीन येथे झालेल्या खुनात रामपुर वस्तीत राहणारेच आरोपी होते. याठिकाणी मोठ्या प्रमाणात डिझेल चोर, कोळसा चोर व भंगार चोर आहे. सोबतच मोठ्या प्रमाणात याठिकाणी जुगार व सट्टा चालतो. यामुळे येथील युवक यामध्ये गुटले असून यावर वेळीच आवर न बसल्यास यासारख्या घटना पुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. (rajura) (aamcha vidarbha)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top