Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: पत्रकार अनिल बाळसराफ यांनी निभावले सामाजिक दायित्व
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
वेकोलीतून सेवानिवृत्त झाल्यावर चाय टपरी चालवणाऱ्या महिलेचा केला सत्कार सास्ती ओपनकास्ट माईन मधून ११ कर्मचारी निवृत्त आमचा विदर्भ - दीपक शर्म...
वेकोलीतून सेवानिवृत्त झाल्यावर चाय टपरी चालवणाऱ्या महिलेचा केला सत्कार
सास्ती ओपनकास्ट माईन मधून ११ कर्मचारी निवृत्त
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
राजुरा (दि. १ जुलै २०२३) -
        माणूस नौकरीवर राहिला तर त्याच्या सेवानिवृत्तीचे वय ठरलेले असते मात्र, आपण जिथे आपण वर्षानुवर्षे नौकरी केली तिथले किरकोळ व्यावसायिक, हॉटेल व  चाय स्टॉल चालविणारे अशा लोकांशी यांच्याशी कर्मचाऱ्यांचे ऋणानुबंध होतात. सदर व्यापारी हे अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवनमान जगत आपले पोट भरीत असतात. परंतु आपण सेवानिवृत्त होत असताना त्या किरकोळ व्यापाऱ्यांप्रती आपलेही काही देणे लागते, अशी भावना बारगळणारे क्वचितच असतात. दि. ३० जून ला सेवानिवृत्तीचे औचित्य साधून सास्ती ओपनकास्ट माईन मध्ये कार्यरत असणारे आणि आता सेवानिवृत्त होत असतांना पत्रकार अनिल बाळसराफ यांनी खाण परिसरात दुर्लक्षित चाय टपरी चालवणाऱ्या एका महिलेचा साडी-चोळी देत सत्कार केला. या सत्काराने चाय टपरी चालवणारी ही महिला भारावून गेली. यावेळी भारतीय कोळसा खदान मजदूर संघाचे जेष्ठ नेते व कामगार वेज बोर्डचे सदस्य सुधीर घुरडे, इंटकचे जेष्ठ नेते आर.आर. यादव, एचएमएस अध्यक्ष अशोक चिवंडे, रंगराव कुळसंगे, गणेश नाथे, ओबीसी वेलफेयर असोसिएशन बल्लारपूर क्षेत्राचे अध्यक्ष रवि डाहुले, विजय कानकाटे, भारतीय मजदूर संघाचे महादेव तपासे, विवेक अल्लेवार, संजय ठवकर, भास्कर कायरकर, सुदर्शन डोहे, आनंद पाटील, रामलिंगु झुपाका, तुलाराम गेडाम प्रामुख्याने उपस्थित होते. सामाजिक बांधिलकी दाखवित केलेल्या या कार्याबद्दल बाळसराफ यांचे सर्वच स्तरावरून अभिनंदन होत आहे. अनिल बाळसराफ हे लोकसत्ता व नवराष्ट्र या विभागीय वृत्तपत्रात वार्ताहरसुद्धा आहे, हे येथे विशेष. (Chai tapri woman felicitated after retiring from WCL)

सास्ती ओपनकास्ट माईन मधून ११ कर्मचारी निवृत्त
        वेकोलि बल्लारपूर क्षेत्रातील सास्ती ओपेनकास्ट माईनमधून ३० जून ला जवळपास ११ कर्मचारी सेवानिवृत्त झाले. (11 employees retired from Sasti Opencast Mine) त्यात (Anil Kumar Balsaraf) अनिलकुमार बाळसराफ, काली रेड्डी, सत्यशील तोताडे, सुनील सूर्यवंशी, मो. इम्तिहार, अरुण बुटे, जनार्धन कुकुडकर, मो. मंजूर, आर.डी. धारणे, एस.सी. बहुरिया, विवेक अल्लेवार यांचा समावेश होता. वेकोलि तर्फे या सर्व सेवानिवृत्त होत असलेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार आर.सी. ऑफिसात करण्यात आला. यावेळी खान व्यवस्थापक, कर्मचारी व कामगार मोठ्या संख्येत उपस्थित होते. तसेच गोवरी डीप या खदानीतूनही काही वेकोलि कर्मचारीही सेवानिवृत्त झाले त्यात धार्मिक कार्यात प्रामुख्याने भाग घेणारे तुळशीराम जेंगठे यांचाही समावेश होता. (Coal India) (Rajura) (Aamcha Vidarbha)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top