Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: अमलनाला येथील पुरातन मंदिरात शंकर देवाच्या मुर्तीची समाजकंटकाकडुन विटंबना
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
भाजपने पोलिस ठाण्यात तक्रार देऊन आरोपीला गजाआड करण्याची केली मागणी आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत ( तालुका प्रतिनिधी) गडचांदुर (दि. १ जून २०...
भाजपने पोलिस ठाण्यात तक्रार देऊन आरोपीला गजाआड करण्याची केली मागणी
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत ( तालुका प्रतिनिधी)
गडचांदुर (दि. १ जून २०२३) -
        दि. ३१ जुनच्या रात्री अमलनाला धरण परिसरातील टेकडीवर, भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या प्राचीन शंकरदेवाच्या मुर्तीची विटंबना काही समाजकंटकांकडून करण्यात आली. (gadchandur) (aamcha vidarbha)

        काही वर्षांपूर्वी त्याच परिसरात दुर्गादेवी मुर्तीचे हात खंडित करून विटंबना करण्यात आली होती परंतू पोलीस प्रशासनाने दखल घेतली नव्हती, आता मात्र या प्रकरणाची तक्रार पोलीस निरीक्षक, गडचांदुर व तहसीलदार कोरपना यांना रीतसर देण्यात आली असून याबाबतची तक्रार भाजप शहर अध्यक्ष सतीश उपलेंचवार, नोकारीचे उपसरपंच वामनराव तुराणकर, निलेश ताजने, नगरसेवक अरुण डोहे, रामसेवक मोरे, रोहन काकडे, गोपाल मालपाणी, शिवाजी सेलोकर, डॉ. श्रीनिवास सोनटक्के, मोतीराम बल्की यांनी दिली. या प्रकरणी पोलिसांनी दोषी आरोपींचा शोध घेऊन कडक कार्यवाही करावी अशी मागणी केली. (BJP)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top