Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: भारत राष्ट्र समितीची आढावा बैठक संपन्न
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राजुरा विधानसभा क्षेत्र समन्वयक आनंदराव अंगलवार यांच्या  नेतृत्वात  सदस्य नोंदणी जोमात आमचा विदर्भ - विरेंद्र पुणेकर (प्रतिनिधी ) राजुरा (दि...
राजुरा विधानसभा क्षेत्र समन्वयक आनंदराव अंगलवार यांच्या नेतृत्वात सदस्य नोंदणी जोमात
आमचा विदर्भ - विरेंद्र पुणेकर (प्रतिनिधी )
राजुरा (दि. १ जून २०२३) -
        भारत राष्ट्र समिती महाराष्ट्र प्रदेश नागपूर विभागाचे पूर्व विदर्भ समन्वयक ज्ञानेश वाकुडकर, पूर्व विदर्भ सहसमन्वयक संजय बोरकर, विभाग पदाधिकारी अलोने यांचे चंद्रपुर येथील शासकीय विश्रामगृहात सहा विधानसभाक्षेत्राची आढावा बैठक व बल्लारपूर येथे पक्ष कार्यालय उदघाटन, राजुरा  विधान सभाक्षेत्रात रामपूर येथे पक्ष प्रवेश व सदस्य नोंदनीसाठीची आढावा बैठक संपन्न झाली. 

        राजुरा व रामपूर येथील कार्यक्रमात बीआरएस चे विदर्भ समन्वयक ज्ञानेश वाकुडकर यांनी या पुर्वीचे सरकार व वर्तमान सरकारचे जनतेच्या समस्येबाबतचे उदासीन धोरण सामाजीक विकासासाठी इच्छाशक्तीचा अभाव याबाबतचे मार्गदर्शन केले. उपस्थित पक्षातील पधाधिकाऱ्यांनी पक्ष सदस्य नोंदणी भर देण्याचे तसेच कार्यकर्त्यांना याबाबत काचोटीने परिश्रम घेण्याचे आवाहन केले. याप्रसंगी ज्ञानेश वाकुडकर यांचे हस्ते विविध पार्टीतील शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षाचे प्रतीक, गुलाबी दुपट् टाकून पक्षात प्रवेश घेतला. 

        यावेळी जिल्हा समन्वयक  वंशी कृष्णा, राजुरा विधानसभा क्षेत्र समन्वयक आनंदराव अंगलवार, सौ. रेशमा चव्हाण, राकेश चिलकुरवार, बबलू चिटकाला, ज्योती नळे, श्रीमती अनसुर्या नुथि, सदस्य अजय सकीनाला, सन्नी रेडडी, आशिष नामवाड  सह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आनंदराव वाय अंगलवार यांनी केले. (Rajura Vidhan Sabha Constituency Coordinator Anandrao Angalwar's Member Registration Vigor) (aamcha vidarbha) (rajura)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top