Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: दुचाकीवरील दोघांनाही हेल्मेट बंधनकारक
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
मोटारवाहन कायद्याची कडक अंमलबजावणी होणार आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे चंद्रपूर (दि. १ जून २०२३) -         जिल्ह्यात होणाऱ्या अपघातात मोटा...
मोटारवाहन कायद्याची कडक अंमलबजावणी होणार
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
चंद्रपूर (दि. १ जून २०२३) -
        जिल्ह्यात होणाऱ्या अपघातात मोटार सायकलस्वारांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त प्रमाणात दिसून येत असल्याने जिल्ह्यात दुचाकी मोटारसायकल चालक व त्यांचे मागे बसणाऱ्या चार वर्षावरील सर्व व्यक्तींना मोटार वाहन कायद्यानुसार हेल्मेट परिधान करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मोटारवाहन  कायद्यातील नियमांची जिल्ह्यात कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. (Motor Vehicle Act will be strictly enforced)

        जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, महामंडळे, नगरपालिका, नगरपरिषद, सर्व शासकीय आस्थापना व खाजगी संस्थेतील अधिकारी कर्मचारी व नागरिकांनी या बाबीची दखल घ्यावी.  (aamacha vidarbha)

        वाहनधारकाने नियमाचे उल्लंघन केल्यास संबंधीतांविरूद्ध मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा नोंद करून त्यांच्याकडून एक हजार रुपये दंड तसेच वाहन धारकाची अनुज्ञप्ती 3 महिन्यासाठी निलंबित करण्यात येईल, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी कळविले आहे. (Sub-Regional Transport Officer) (Chandrapur)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top