Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: बबन उरकुडे - दिलेला शब्द पाळणारा माणूस
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
वाढदिवसाप्रसंगी रामपुरातील रामपूर येथील गुरुदेव सेवा मंडळ समोर टिन शेडचे भूमिपूजन आमचा विदर्भ - विरेंद्र पुणेकर (प्रतिनिधी) राजुरा (दि. ३ जू...
वाढदिवसाप्रसंगी रामपुरातील रामपूर येथील गुरुदेव सेवा मंडळ समोर टिन शेडचे भूमिपूजन
आमचा विदर्भ - विरेंद्र पुणेकर (प्रतिनिधी)
राजुरा (दि. ३ जून २०२३) -
        छत्रीपती शिवाजी महाराज जयंतीप्रसंगी शिवसेना विधानसभा समन्वयक बबन उरकुडे यांनी गुरुदेव सेवा मंडळ प्रतिष्ठान समोर टिनाचे भव्य शेड उभारणार अशी घोषणा केली होती. त्या अनुषंगाने ३ जून रोजी वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना नेत्या निकिता रमेश झाडे आणि गोवरीच्या सरपंच आशा उरकुडे, मायाबाई मालेकर यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. (Bhoomipujan of tin shed in front of Gurudev Seva Mandal at Rampur in Rampur on the occasion of birthday)

        सामाजिक कार्यात एखादा व्यक्ती स्वतःला किती झोकून देऊन काम करू शकतो हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. या शेडकरीता अंदाजे एक ते सव्वा लाख रक्कमेचा खर्च येणार आहे. रामपूर वासियांच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहून कुठलीही अपेक्षा न करता कार्य करत राहील असं मत बबन उरकुडे यांनी व्यक्त केले. यावेळी गुरुदेव सेवा मंडळ आणि रामपूर वासियांनी उपस्थित राहून बबन उरकुडे याना शुभेच्छा दिल्या आणि आभार व्यक्त केले. (Rampur - Rajura) (baban Urkude)

        शिवसेनेच्या माध्यमातून सतत रामपूर संबंधित समस्यांवर लक्ष ठेवल्या जात असून जनसंपर्क सुद्धा वाढला आहे. त्यामुळे विरोधकांमध्ये पण धास्ती पोहचली आहे. रामपूर ग्रामपंचायतीवर सध्या भाजप-संघटनेची सत्ता असली तरी पुढील निवडणुकीत सरपंच पद हे महिला अनुसूचित जाती करिता राखीव येईल अशी चर्चा असल्याने समाजसेवेकरीता नेहमी धावून जाणारे लोकप्रिय व्यक्तिमत्व असलेले शिवसेना उपतालुका प्रमुख, ग्राम पंचायत सदस्य रमेश झाडे यांची पत्नी निकीता झाडे यांना सामोरे करून शिवसेने निवडणुकीची तयारी सुरु केली कि काय अशी चर्चा सुरु झाली आहे.

        बबन उरकुडे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे उपतालुका प्रमुख (Ramesh Zade) रमेश झाडे आणि युवासेना तालुका प्रमुख बंटी मालेकर यांनी रामपूर मध्ये जनसंपर्क वाढविण्यात सुरुवात केली असून येणाऱ्या काळात याचा काय परिणाम दिसून येणार हि येणारी वेळच सांगणार आहे. (aamcha vidarbha) 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top