Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगराने वाहिली लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांना आदरांजली
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे चंद्रपूर (दि. ४ जून २०२३) -         भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते तसेच महाराष्ट्रात भाजप पक्षाला प्रबळ करणा...
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
चंद्रपूर (दि. ४ जून २०२३) -
        भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते तसेच महाराष्ट्रात भाजप पक्षाला प्रबळ करणारे लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे साहेब यांची आज 3 जून रोजी ९वी पुण्यतिथी निमित्य भाजप चंद्रपूर महानगरातील जिल्हाध्यक्ष कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत साहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. (BJP Chandrapur Mahanagara) (Chandrapur) (Death anniversary of Gopinath Munde)

        स्व. गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाला मजबुतीकरण करण्याचे महान कार्य केले त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्रातील कार्यकर्ते त्यांचेकडून प्रेरणा घेऊन पक्ष वाढीसाठी उत्कृष्ट कामे करायची त्याचेच फलित आज महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश मिळाले. लोकनेते मुंडे साहेबांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे विरोधी पक्षातील नेते त्यांचा आदर करत होते अश्या त्यांच्या वागण्यामुळे साहेबांच्या स्मरणार्थ संपूर्ण महाराष्ट्रात आदरांजली वाहिली जात आहे. त्यामुळे आज आपल्याला लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे साहेबांच्या कार्याची प्रेरणा घेऊन भारतीय जनता पक्षाचे चंद्रपूर महानगरात एकनिष्ठतेने काम केले पाहिजे असे आज या आदरांजली कार्यक्रमात महानगराचे जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांनी सर्व कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. (Dr. Mangesh Gulwade)

        यावेळी चंद्रपूर जिल्हा महानगराचे जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे,  महानगराचे महामंत्री ब्रिजभूषण पाझारे, रवी गुरनुले, भाजयुमो अध्यक्ष विशाल निंबाळकर, चंद्रपूर जिल्हा महानगरातील मंडळ अध्यक्ष दिनकर सोमलकर, विठ्ठल डुकरे, रवी लोणकर तसेच नसरीन शेख, स्मिता रेभनकर, वंदना संतोषवार, सौ, अपर्णा प्रवीण चिडे, शशिकांत म्हस्के, संजय श्रा, गरमडे, कुंदन खोब्रागडे, गणेश गजानन झाडे इत्यादींची प्रामुख्याने उपस्थिती होती. (aamcha vidarbha)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top