Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: दहावीच्या निकालात इन्फंट कान्व्हेंटच्या विद्यार्थ्यांची उत्कृष्ट कामगिरी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - अनंता गोखरे द्वारे राजुरा (दि. २ जून २०२३) -         दिनांक २ जून २०२३ रोजी इयत्ता दहावी स्टेट बोर्डाच्या जाहीर झालेल्या निकाल...
आमचा विदर्भ - अनंता गोखरे द्वारे
राजुरा (दि. २ जून २०२३) -
        दिनांक २ जून २०२३ रोजी इयत्ता दहावी स्टेट बोर्डाच्या जाहीर झालेल्या निकालात इन्फट जिसस इंग्लिश पब्लिक हायस्कूल राजुराच्या विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी करीत बाजी मारली. (Infant Jesus ​​English High School Rajura)

        यात सुरज बंडू रागीट ने ९३.८०% गुण घेऊन इन्फट कान्वेंट मधून प्रथम क्रमांक पटकावला आहे. कु. काजल रामा चन्ने ने ९०.८०% गुण मिळवून द्वितीय तर कु. काया संतोष चौधरी ने ८९.४०% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला आहे. तृणाल भाविदास बुटले ८९.२०%, व कु. श्रुती दिनेश पारखी ने ८८.४०% गुण घेऊन अनुक्रमे चतुर्थ व पाचवा क्रमांक पटकाविला. शैक्षणिक सत्र सन २०२२-२०२३ या वर्षी इयत्ता दहावी स्टेटच्या परिक्षेसाठी एकूण ६१ विद्यार्थी परिक्षेला बसले होते. यातून २ विद्यार्थी मेरीटमध्ये, ३७ विद्यार्थी डिस्टींक्शन मध्ये, १८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर ३ विद्यार्थी द्वितीय क्षेणीत उत्तीर्ण झाले. (subhash Dhote)

        विद्यार्थ्यांच्या या कामगिरी व यशाबद्दल विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी वृंदांचे आमदार तथा इन्फट जिसस सोसायटीचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे, संस्थेचे सचिव तथा नगराध्यक्ष अरुण धोटे, शाळेचे संचालक अभिजित धोटे, स्टेट शाखेच्या मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू, सीबीएसई शाखेच्या मुख्याध्यापक रफिक अन्सारी, यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे. (rajura) (aamcha vidarbha)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top