Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: एकाच कुटुंबातील तिघांचा अपघातात मृत्यू
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
एकाच कुटुंबातील तिघांचा अपघातात मृत्यू दुचाकी स्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात झाला अपघात ब्रम्हपुरी (दि. १७ एप्रिल २०२३) -         आपल्या स...
एकाच कुटुंबातील तिघांचा अपघातात मृत्यू
दुचाकी स्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात झाला अपघात
ब्रम्हपुरी (दि. १७ एप्रिल २०२३) -
        आपल्या संपूर्ण परिवारासह आयुर्वेदिक औषध घेण्यासाठी स्वतःच्या मालकीच्या गाडीने मध्यप्रदेशातील बैहर येथील कुमादेही येथे जात असताना किरणापुर नजिक नेवरागाव कला येथे झालेल्या अपघातात ब्रम्हपुरी येथील एकाच कुटुंबातील तिघांना जागीच मृत्यू झाला तर दोन चिमुकल्यासह दोन जण गंभीर जखमी असून गोंदिया येथे शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून एकाच कुटुंबातील तिघांच्या मृत्यू झाल्याने परिसरात व शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (An accident occurred while trying to save the bike rider) (Bramhapuri)

        ब्रम्हपुरी येथील श्रीनगर कॉलनीतील रहिवाशी सेवानिवृत्त बस चालक विजय गणपत बडोले हे आपल्या परिवारासह काल दिनांक १६/४/२०२३ ला स्वतःच्या चार चाकी वाहनाने मध्यप्रदेशातील बैहर येथील कुमादेही येथे जात असताना किरणापुर नजिक नेवरागाव कला येथे एका दुचाकी वाहनास वाचविण्याच्या प्रयत्नात असताना चालकाचा तोल गेल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला जाऊन धडक दिली त्या भीषण अपघातात वाहकचालक विजय गणपत बडोले वय ५८ वर्ष हे गंभीर जखमी असून परिवारातील त्यांची पत्नी कुंदा बडोले वय ५२ वर्ष, मुलगा इंजी.गिरीश बडोले वय ३२ वर्ष तर विवाहितमुलगी मोनाली चौधरी (बडोले)यांचा झालेल्या अपघातात जागीच मृत्यू झाला. तर वाहन चालक सेवानिवृत्त विजय बडोले, सून बबिता बडोले आणि दोन लहान चिमुकले नातवंड हे गंभीर जखमी झाले.वाहनांमध्ये एकाच परिवारातील एकूण सहा जण प्रवास करीत होते. 

        गंभीर जखमीना गोंदिया येथील शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मृतकाचे शवविच्छेदन करून त्यांचे मृतदेह ब्रह्मपुरी येथे आणण्यात आले हे ब्रह्मपुरी तालुक्यातील पहिली घटना आहे एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू त्यांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळव्यक्त केली जात आहे. मृतकावर काल रात्र रात्री ११.३०. अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या अंत्यविधीला शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.अनेकांना अश्रू अनावर झाले होते.मोठ्या हळव्या अंतकरणाने त्यांना शेवटचा निरोप दिला. आज दिनंक १८/४/२०२३ विजय बडोले यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याचे समजते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top