Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: गडचांदूर येथे जेष्ठ नागरिक सभागृहाचे लोकार्पण
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आ. सुभाष धोटे आणि शिक्षक आ. सुधाकर अडबाले यांच्या हस्ते उद्घाटन  आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत तालुका प्रतिनिधी कोरपना (दि. १ एप्रिल २०२३) ...
आ. सुभाष धोटे आणि शिक्षक आ. सुधाकर अडबाले यांच्या हस्ते उद्घाटन 
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत तालुका प्रतिनिधी
कोरपना (दि. १ एप्रिल २०२३) -
        (Nagar Parishad Gadchandur) नगर परिषद गडचांदुर येथे जेष्ठ नागरिक सेवा संस्था, गडचांदूर यांच्या मागणी नुसार आमदार सुभाष धोटे यांच्या स्थानिक निधी अंतर्गत जेष्ठ नागरिकांसाठी २० लक्ष रुपयाच्या सभागृहाचे बांधकाम पूर्ण होऊन या सभागृहाचे लोकार्पण आमदार सुभाष धोटे आणि शिक्षक आमदार सुधाकराव अडबाले यांचा हस्ते पार पडले. 

        या प्रसंगी नगराध्यक्षा सविता टेकाम, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक विलास धांडे, माजी जि. प. सदस्य तथा जेष्ठ नेते अरुण निमजे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष केशवराव ठाकरे, माजी तालुकाध्यक्ष विठ्ठलराव थिपे, नामदेवराव येरणे, सचिव बाळासाहेब मोहितकर, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र अरोरा, नगरसेवक पापय्या पोनमवार, माजी सभापती रऊफ खान वजीर खान, नगरसेवक विक्रम येरणे, अर्चना वांढरे, अरविंद मेश्राम, शहराध्यक्ष संतोष महाडोळे, रुपेश चुदरी, शिवकुमार राठी, एल डी मोहितकर, लक्ष्मण दरेकर, बाबुराव शेरकी, शिवजी शेलोरकर, देविदास मुन यासह जेष्ठ नागरिक, महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होते. (Mayor Savita Tekam) (Gadchandur)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top