आमचा विदर्भ - (दीपक शर्मा)
राजुरा (दि. २५ मार्च २०२३) -
जागतिक क्षयरोग दिनानिमित्त आरोग्यवर्धिनी केंद्र पेलोरा येथे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रकाश नागराळे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक प्रबोधन व जनजागृतीसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. अक्षय बुर्लावार यांनी क्षयरोग टाळण्यासाठी पूर्व खबरदारी कशी घ्यावी याबद्दल माहिती दिली. डॉ. बुर्लावार म्हणाले की, खोकला, ताप, दीर्घकाळ वजन कमी होणे, अशी लक्षणे दिसताच तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार घ्यावा. गावात स्वच्छता ठेवणेही तितकेच गरजेचे आहे. (Enlightenment and public awareness at Aarogyavardhini Kendra Pelora)
यावेळी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक शैलेश पोडेल्लीवार. आरोग्य विभागाचे सतीश कौरासे, संजय चिडे, वैशाली आसनपल्लीवार, आरोग्य विभागाचे कर्मचारी, गावातील नागरिक शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता आशा वर्करची भूमिका महत्त्वाची ठरली.
(World Tuberculosis Day)
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.