Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: जगन्नाथ बाबा मठात दोन इसमाची हत्या
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
भद्रावती तालुक्यातील घटना आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स भद्रावती (दि. २३ मार्च २०२३) -         जिल्हात दररोज चोरी-दरोडे मारहाण यांचे प्रमाण...
भद्रावती तालुक्यातील घटना
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
भद्रावती (दि. २३ मार्च २०२३) -
        जिल्हात दररोज चोरी-दरोडे मारहाण यांचे प्रमाण वाढत असून पोलिसांना आता अधिक सावध राहण्याची पाळी आली आहे. शहरासह ग्रामीण भागातही चोरटयांनी धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील मांगली गावातील जगन्नाथ महाराज मठात दोघांचा खून झाल्याची धक्कादायक घटना आज सकाळच्या वेळेस उघडकीस आली. मधुकर लटारी खुजे (६०), बाबुराव संभा खारकर (७७) असे मृतकाचे नाव असून ते मांगली गावातील रहिवाशी आहेत. मठात असलेली दानपेटी फोडलेल्या अवस्थेत होती. त्यामुळे दानपेटी फोडायला आलेल्या चोरांनी हत्या केली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे. भद्रावती तालुक्यातील मांगली येथील मधुकर खुजे, बाबुराव खारकर यांची शेती गावात गावातील जगन्नाथ महाराज मठा लगत आहे. ते रोज शेतात जागलीसाठी जातात. मंदिर लागून असल्याने तिथे विसावा घेतात. बुधवारला पहाटेला मंदिरामध्ये या दोघांचे मृतदेह रक्ताच्या थारोळात पडलेले दिसले. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी मंदिराकडे धाव घेतली. मंदिरातील दानपेटी मंदिरापासून काही अंतरावर फोडलेल्या स्थितीत आढळून आली. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपासाला सुरुवात केली आहे. पोलिसांनी स्वानपथक बोलावले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top