Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: ट्रक ची कार ला समोरासमोर धडक
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
डॉक्टर दांपत्याचा अपघातात मृत्यू आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स चंद्रपूर (दि. २२ मार्च २०२३) -         वरोरा हायवे वर विरुद्ध दिशेने भरधाव य...
डॉक्टर दांपत्याचा अपघातात मृत्यू
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
चंद्रपूर (दि. २२ मार्च २०२३) -
        वरोरा हायवे वर विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या ट्रक क्रमांक MH34 BZ2996 ने समोरासमोर कारला जबर धडक दिली. या भीषण अपघातात कार तब्बल अर्धा किलोमीटर ट्रक ने खेचत नेली. या घटनेत डॉ. अश्विनीचा गौरकार-झाडे (31) घटनास्थळीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी असल्याने डॉ. अतुल गौरकार (34) यांना उपचारार्थ हलविण्यात आले. चंद्रपूर ला नेत असताना भद्रावती जवळ डॉ. अतुल यांचा मृत्यू झाला. हि घटना आज दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली. (Doctor couple died in an accident)

        आज बुधवारी दुपारचे सुमारास हे डॉक्टर दाम्पत्य हे स्वतःचे चिमुकल्या बाळाला घरी ठेऊन वरोरा येथे आले होते. दुपारी MH34 AM4240 या क्रमांकाचे कारने वरोरा येथून वणीकडे निघाले असताना दरम्यान विरुद्ध दिशेने येणाऱ्या MH34 BZ2996 या क्रमांकाचा ट्रकने कारला भिषण धडक दिली. या अपघातात डॉ. अश्विनी हिचा जागीच मृत्यू झाला तर डॉ. अतुल याना स्थानिक नागरिकांनी लगेच पोलिसांना कळवत तातडीने उपचारासाठी हलविले मात्र भद्रावती जवळ वाटेतच त्यांचा मृत्यु झाला.

        डॉ.अश्विनी गौरकार-झाडे या वणी येथे पाच नंबर शाळे जवळ वास्तव्यास होत्या. त्या तीन दिवसापूर्वी येथील ग्रामीण रुग्णालयात कर्तव्यावर रुजू झाल्या होत्या. डॉ. अतुल गौरकार हे वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे कर्तव्य बजावत होते.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top