Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: गडचांदूरात ऑल इंडिया व्हॉलीबॉल सामान्याचा समारोप
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
दृढ संकल्प स्पोर्टींग क्लब व भीमसेना बहुउ्देशीय सुधार संस्थेने घेतला होता पुढाकार आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत तालुका प्रतिनिधी गडचांदूर (...
दृढ संकल्प स्पोर्टींग क्लब व भीमसेना बहुउ्देशीय सुधार संस्थेने घेतला होता पुढाकार
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत तालुका प्रतिनिधी
गडचांदूर (दि. ३० मार्च २०२३) -
        गडचांदूरात दि. २४ ते २६ मार्च दरम्यान तीन दिवसीय ऑल इंडिया व्हॉलीबॉल सामान्यांचे आयोजन दृढ संकल्प स्पोर्टींग क्लब गडचांदूर व भीमसेना बहुउ्देशीय सुधार संस्था गडचांदूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पुरुष गटात प्रथम क्रमांक जय अकॅडमी तामिळनाडू, द्वितीय क्रमांक ऑरेंज सिटी नागपूर तर तृतीय क्रमांक महाराष्ट्र स्पायकर्स यांनी पटकवला. मुलींमध्ये प्रथम क्रमांक एस.आर.एम. युनिव्हर्सिटी चेन्नई, द्वितीय क्रमांक नागपूर व तृतीय क्रमांक जबलपूर यांनी पटकवला. कार्यक्रमाचे उदघाटन आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते झाले यावेळी  नगराध्यक्षा सविता टेकाम, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नप उपाध्यक्ष शरद जोगी, स्वागताध्यक्ष सचिन भोयर, नगरसेवक अरुण डोहे, रामसेवकजी मोरे, नप मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळकी, नगरसेवक सागर ठाकुरवार, पंडित काळे उपस्थित होते. (gadchandur) (sport)

        बक्षीस वितरण राजुरा नपचे माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, पापय्या पोन्नमावर, डॉ. कुलभूषण मोरे, गडचांदूर नपचे उपाध्यक्ष शरदभाऊ जोगी, नगरसेवक रामसेवकजी मोरे, डॉ. कुलभूषण मोरे, जिप शाळेच्या मुख्याध्यापिका शेख परवीन, सुधीर पिंपळकर, देविदास मुन, सुधाकर बोरकर यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेच्या यशस्वितेकरिता विनोद तराळे, शिरीष बोगावार, विजय डाहुले, राजूभाऊ खटोड, के.सी. जोशी, सुनिल बोरीकर, निखिल बुरांडे, विक्की मुन, नवीन कंदी, प्रविण चापले, राहुल ठोंबरे, ओम भोयर, वैभव चौधरी, अमरदीप हिरादेवे यांनी परिश्रम घेतले. आभार विक्की मुन यांनी मानले. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top