Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: तीन वर्षीय बालिकेवर अत्याचार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आरोपीविरुद्ध पास्को अंतर्गत गुन्हा दाखल आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत तालुका प्रतिनिधी कोरपना (दि. २९ मार्च २०२३) -         तालुक्यातील एका...
आरोपीविरुद्ध पास्को अंतर्गत गुन्हा दाखल
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत तालुका प्रतिनिधी
कोरपना (दि. २९ मार्च २०२३) -
        तालुक्यातील एका गावातील तीन वर्षीय बालिकेवर तिच्या चुलत भावाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन वर्षीय बालिकेची अचानक तब्बेत बिघडली असता तिच्या आईने तिला ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी साठी आणले. दरम्यान तिची डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी केली असता मुलीवर अत्याचार झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी पोलिसांनी २२ वर्षीय आरोपी विरुद्ध भादंवि ३७६ अ ब, ६ पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात करण्यात आला असून आरोपीला अटक करून न्यायालयासमोर सादर करण्यात आले. न्यायालयाने त्याला ३१ तारखे पर्यंत पोलिस कस्टडी रिमांड दिली आहे. पुढील तपास ठाणेदार एकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक खेकाडे व पोलीस करीत आहे. (A three-year-old girl was sexually assaulted by her cousin) (korpana)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top