राजुरा - (दि. २५ नोव्हेंबर २०२२)
श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा जिल्हा चंद्रपूर येथील राष्ट्रीय सेवा योजना पथक व वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय, राजुरा (प्रादे.) च्या संयुक्त विद्यमाने मार्गशीर्ष महिन्यात महिनाभर चालणाऱ्या जोगापूर यात्रेच्या सुरवातीला भाविकांच्या सोयीसाठी व स्वच्छता जागरूकतेसाठी जोगापूर देवस्थान परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. (Rashtriya seva Yojana Pathak) (Forest Office) (Range Officer, Rajura)
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस.एम. वारकड, उपविभागीय वन अधिकारी अमोल गर्कल व वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश येलकेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. गुरुदास बलकी, वन विभागातील कर्मचारी मोनू देशकर, जाधव व रासेयो स्वयंसेवकांनी व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी देवस्थान परिसरातील प्लॅस्टिक कचरा उचलून साफसफाई केली. (swachata abhiayan) (hanuman mandir jogapur) (jogapur)
भाविकांनी परिसरात कुठलाही कचरा न टाकता देवस्थान परिसरात स्वच्छता ठेवून पावित्र्य जपावे, या कचऱ्यामुळे परिसर प्रदूषित होत असून वन्यप्राण्यांना त्याचा त्रास सहन करावा लागतो त्यामुळे वन्य प्राण्यांच्या आरोग्यासाठी तसेच भाविकांच्या आरोग्यासाठी सर्वानी स्वच्छता पाळावी असे आवाहन करण्यात आले. (shri shivaji collage rajura)
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.