आमचा विदर्भ - तालुका प्रतिनिधी
राजुरा -
नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था अंतर्गत राष्ट्रीय कला, साहित्य व सांस्कृतिक विकास समिती च्या नागपूर विभाग महिला अध्यक्षा, बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा च्या संचालिका, स्वर प्रीती कला अकादमीच्या संयोजिका अल्का दिलीप सदावर्ते यांच्या एकसष्टी वर्षपूर्ती वाढदिवसानिमित्त आदर्श मराठी प्राथमिक विद्या मंदिर येथील गरजू विद्यार्थ्यांना ब्लँकेट वाटप करण्यात आले. तसेच राष्ट्रीय हरित सेनेच्या दहा ॲक्टिव विद्यार्थ्यांना भेट वस्तू व सर्व विध्यार्थीना पेन आणी मिठाईचे वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अल्का सदावर्ते यांची उपस्थिती होती. तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव भास्करराव येसेकर, दिलीप सदावर्ते, आदर्श शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी पिंगे, आदर्श हायस्कुल चे मुख्याध्यापक सारीपुत्र जांभुळकर, प्रेरित सदावर्ते , अबोली सदावर्ते, मोनिका प्रवीण निळे, प्रिती अनुराग पुरानिक, अंजली गुंडावार,आशिष करमरकर, मनोज तेलीवार, नातवंड आरोही, अंशिका, प्रेषित, प्राप्ती आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नलिनी पिंगे यांनी केले. प्रास्ताविक दिलीप सदावर्ते यांनी केले. तर आभार बादल बेले यांनी मानले. यावेळी राष्ट्रीय हरीत सेनेच्या विध्यार्थीनी अल्का सदावर्ते यांना बर्ड फिडर व कागदापासून निर्मिती केलेल्या विविध कलाकृती भेट दिल्या. सायंकाळी ओम साईराम मंगल कार्यालयात सदावर्ते परिवाराने एकसष्टी वर्षपूर्ती वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी आमदार सुभाष धोटे, माजी आमदार ऍड. संजय धोटे, माजी नागराध्यक्ष अरुण धोटे, बा. शी. प्र. मं. चे अध्यक्ष सतीश धोटे, सचिव भास्कर येसेकर, संचालक अविनाश निवलकर, मधुकर जाणवे, आ. शी. प्र. मं. चे सहसचिव माजी प्राचार्य दौलतराव भोंगळे, व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष संदीप जैन, डॉ. उपगन्लावार, अनेक शाळा महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक, अनेक सेवाभावी संस्थाचे पदाधिकारी, गायन क्षेत्रातील मान्यवर, आप्तस्वीकीय, मित्रपरिवार मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.