Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: आदिवासी भागात गर्भवती माता व बालकांची आरोग्य तपासणी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राजुरा इनरव्हील क्लब द्वारे लक्कडकोड परिसरात आरोग्य तपासणी शिबीर आमचा विदर्भ - तालूका प्रतिनिधी राजुरा - राजुरा तालुक्यातील लक्कडकोट येथे इन...
राजुरा इनरव्हील क्लब द्वारे लक्कडकोड परिसरात आरोग्य तपासणी शिबीर
आमचा विदर्भ - तालूका प्रतिनिधी
राजुरा -
राजुरा तालुक्यातील लक्कडकोट येथे इनरव्हील क्लब ऑफ राजुरा व मानव विकास आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने गर्भवती माता व मुले यांच्या करिता आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात प्रमुख अतिथी उपविभागीय वन अधिकारी अमोल गर्कल, बालरोग तज्ञ डॉ. संदीप बांबोडे, राजुरा उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिता ओरके - कुळमेथे, इनरव्हील अध्यक्षा अर्चना शिंदे, कृतिका सोनटक्के, देवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रातील जनसंपर्क अधिकारी जयश्री हनुवते इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या शिबिरात बोलतांना उपविभागीय अधिकारी अमोल गर्कल म्हणाले की, ग्रामीण भागात गर्भवती महिलांना पुरेसा सकस आहार आणि विश्रांती न मिळाल्याने त्याचा परिणाम त्यांच्या व बाळाच्या प्रकृतीवर होतो. त्यामुळे इनरव्हील क्लब चा हा उपक्रम म्हणजे शहरातील महिलांनी आपल्या ग्रामीण भगिनींना दिलेली ही सुंदर भेट आहे. हा उपक्रम स्तुत्य असून या सोबतच वृक्षांच्या संवर्धनासाठी इनरव्हील क्लब ने पुढाकार घेण्याचे आवाहन केले. डॉ.संदीप बांबोडे यांनी ग्रामीण भागातील महिलांनी आपली आणि आपल्या मुलांची कशी काळजी घ्यावी, या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ.अनिता ओरके यांनी महिला व मुलींना उद्भवणारे आजार, याच्या बचावासाठी घ्यायची काळजी आणि काही समस्या उद्भवल्यास कुठलाही तात्पुरता इलाज न करता त्वरित शासकिय दवाखान्यात जाण्याचे आवाहन केले. शासकिय दवाखान्यात सर्व प्रकारच्या औषधी व उपचार मोफत उपलब्ध असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. 
प्रास्ताविक करताना इनरव्हील अध्यक्षा अर्चना शिंदे यांनी संस्थेच्या कार्याबद्दल माहिती दिली. या आरोग्य शिबिरात 31 गर्भवती महिला आणि  26 बालक व मातांची तपासणी करण्यात आली. या गर्भवती महिलांना विनामूल्य औषधी, ड्राय फ्रूटस, बिस्कीट यांचे वाटप करण्यात आले. शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन आसावरी बोनगीरवार यांनी केले. शिबिराला प्रणिता धाबे, कल्याणी गुंडावार, रचना उपगन्लावर, वृषाली बोनगिरवार यांचेसह गावातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top