Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: 13 सप्टेंबर पासून कोरपना व जिवती तालुक्यात कृष्ठरोग व क्षयरोग शोध मोहीम
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
13 सप्टेंबर पासून कोरपना व जिवती तालुक्यात कृष्ठरोग व क्षयरोग शोध मोहीम धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी कोरपना - सार्वजनिक आरोग्य व...
13 सप्टेंबर पासून कोरपना व जिवती तालुक्यात कृष्ठरोग व क्षयरोग शोध मोहीम
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
कोरपना -
सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत 13 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर पावेतो कोरपना व जिवती तालुक्यात कृष्ठरोग शोध मोहीम व सक्रिय क्षयरोग रुग्ण शोध मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत समाजातील जनमानसात कृष्ठरोग व क्षयरोग या आजाराबद्दल माहिती, लक्षणे व उपचार याबद्दल जनजागृती करण्यात येणार आहेत. असे रुग्ण शोधून त्यांच्यावर तातडीने उपचार करणे व या रोगाचा होणार प्रसार कमी करणे हे मुख्य ध्येय आहे.
कृष्ठरोग व क्षयरोग चे लक्षणे दिसून येताच रुग्णांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन किंवा गृहभेट देण्यासाठी येणाऱ्या आरोग्य सेवकांकडून तपासणी करून उपचार करून घ्यावे असे आवाहन कोरपना व जिवती तालुक्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ स्वप्नील टेम्भे यांनी केले आहे.
या शोध मोहिमेत कृष्ठरोग व क्षयरोग आजाराबद्दल माहिती, तपासणी, आरोग्य पथकाद्वारे करण्यात येणार असून या पथकातआशा कार्यकर्ता पुरुष स्वयंसेवक घरोघरी जाऊन तपासणी करणार आहे, संशयित आढळून येणाऱ्या रुग्णांचे थुंकी नमुने प्राथमिक आरोग्य केंद्र, नारंडा, जिवती, पाटण तसेच ग्रामीण रुग्णालय गडचांदूर व कोरपना येथे तपासणी करीता पाठविले जाईल. तरी नागरिकांना या मोहिमेला सहकार्य करावे असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील टेम्भे यांनी केले आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top