Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: नागभीडच्या आंगणवाडीत बालगोपाल पंगत संपन्न
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
नागभीडच्या आंगणवाडीत बालगोपाल पंगत संपन्न भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव निमित्य विविध उपक्रम आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क नागभीड - भारत...
नागभीडच्या आंगणवाडीत बालगोपाल पंगत संपन्न
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव निमित्य विविध उपक्रम
आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क
नागभीड -
भारताला स्वातंत्र्य मिळुन ७५ वर्षे पुर्ण झाल्याबद्दल संपुर्ण देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पकतेने अमृत महोत्सवी अभियानाअंतर्गत विविध उपक्रम साजरे केल्या जात आहेत. नागभीड येथील दिनांक १३ ऑगस्ट २०२२ ला आंगणवाडीत बाल गोपाल पंगत आयोजित करण्यात आली होती. 
आंगणवाडी क्र. २ व ८ मध्ये संयुक्तपणे झालेल्या मुख्य कार्यक्रमाचे उद्घाटन नागभीड पंचायत समितीच्या संवर्ग विकास अधिकारी कु. प्रणाली खोचरे गायकवाड मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी तालुका बालविकास प्रकल्प अधिकारी राजेंद्र ठोंबरे, माजी जि.प. सदस्य तथा भाजपा जिल्हा संघटन महामंत्री संजय गजपुरे व पं.स. चे ज्येष्ठ सहा (लेखा) अजय दलाल यांची उपस्थिती होती. यावेळी या दोन्ही आंगणवाडीतील लाभार्थी विद्यार्थ्यांना लोकसहभाग मधून केळी  व पोषक नाश्ता देण्यात आला. या माध्यमातुन लहान मुलांना सकस आहाराचे महत्व पटवून देत पालकांनी आपल्या पाल्यांच्या उत्तम आरोग्यासाठी नियमितपणे सकस आहाराचे सेवन करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन उपस्थितांनी केले. 
यानंतर घर घर तिरंगा अभियानाअंतर्गत उपस्थित अतिथी, कर्मचारी व विद्यार्थी यांच्या हातात तिरंगा ध्वज देऊन भारतमातेचा जयघोष करण्यात आला. कार्यक्रम यशस्वितेसाठी बालविकास प्रकल्प नागभीड चे कनिष्ठ सहाय्यक संदिप उईके, आंगणवाडी सेविका सौ. ज्योत्स्ना गजानन वाकडे व सौ. नंदाताई गिरीधर अमृतकर तसेच आंगणवाडी मदतनीस श्रीमती माया गंगाधर शेंडे व सौ. यशोधरा नामदेव सहारे यांनी अथक प्रयत्न केले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top