Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: महिला कृषी सहायक व सत्यप्रत केंद्राचा चालकाला लाच घेताना अटक
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
महिला कृषी सहायक व सत्यप्रत केंद्राचा चालकाला लाच घेताना अटक आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क राजुरा - कृषी केंद्राचे विक्री परवाने अद्यावत करून ...
महिला कृषी सहायक व सत्यप्रत केंद्राचा चालकाला लाच घेताना अटक
आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क
राजुरा -
कृषी केंद्राचे विक्री परवाने अद्यावत करून देण्याच्या कामासाठी 10 हजार रुपये लाचेची मागणी करून स्वीकारणाऱ्या चंद्रपूर येथील कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी सहायक जया विजय व्यवहारे यांच्यासह राजुरा येथील एका सत्यप्रत केंद्राचे मालक वैभव विजय धोटे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून अटक केली.
आपले सरकार या पोर्टल प्रणालीवर राजुरा तालुक्यातील पोवनी येथील तक्रारदारांच्या 4 जुन्या कृषी केंद्राचे विक्री परवाने नविनीकरण करणे, नविन परवाना काढून देणे व सर्व कृषी केंद्र परवाने स्थालांरित करुन देण्याचे काम करायचे होते. या कामाकरिता जया व्यवहारे यांनी 4 ऑगस्ट रोजी तक्रारदाराकडे 10 हजार रुपयांची मागणी केली होती. याबाबतची तक्रार तक्रारदारने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. तक्रारीवरून 5 ऑगस्टला सापळा रचण्यात आला. कारवाईदरम्यान आरोपी जया व्यवहारे यांनी तक्रारदाराकडे 10 हजार रुपये लाचेची मागणी करून ती रक्कम गणपती कम्युनिकेशन आणि झेरॉक्स सेंटरचा मालक वैभव धोटे याच्या मार्फतीने स्वीकारली. तर, तक्रारदारकडून 10 हजार रुपये स्वीकारतान लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी वैभव धोटे याला रंगेहाथ पकडले. या प्रकरणी जया व्यवहारे यांना कृषी अधीक्षक, कृषी अधिकारी कार्यालय चंद्रपूर येथून ताब्यात घेण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नागपूरचे पोलिस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलिस अधीक्षक मधुकर गिते तसेच लाच लुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूरचे पोलीस उपअधीक्षक अविनाश भामरे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक शिल्पा भरडे, जितेंद्र गुरुनुले तसेच कार्यालयीन चमू पोलिस उपनिरीक्षक रमेश दुपारे, नरेशकुमार नन्नावरे, रोशन चांदेकर, रवीकुमार देंगळे, वैभव गाडगे, मेघा मोहर्ले, पुष्पा काचोळे आदींनी पार पाडली.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top