Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: अधिकाऱ्याकडून सतत पैशांची मागणी राजुरा एसटी डेपोमध्ये कार्यरत कर्मचाऱ्याने केली आत्महत्या
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अधिकाऱ्याकडून सतत पैशांची मागणी राजुरा एसटी डेपोमध्ये कार्यरत कर्मचाऱ्याने केली आत्महत्या मृतदेहाजवळ सापडली चिठ्ठी स्वातंत्र्यदिनी घडली बल्ल...
अधिकाऱ्याकडून सतत पैशांची मागणी
राजुरा एसटी डेपोमध्ये कार्यरत कर्मचाऱ्याने केली आत्महत्या
मृतदेहाजवळ सापडली चिठ्ठी
स्वातंत्र्यदिनी घडली बल्लारपूर येथे दूर्दैवी घटना
एच.एन. (राजेश) अरोरा - आमचा विदर्भ प्रतिनिधी
बल्लारपूर/राजुरा -
देशात एकीकडे अमृत महोत्सव सुरू असताना चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा एस डेपोतील एका तरुण कर्मचाऱ्याने स्वतःच्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आला आहे. आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्यांचे नाव भगवान यादव (वय ३०) आहे. ते कन्नमवार वार्ड,टेकडी, बल्लारपूर येथील राहिवासी आहे. आत्महत्या करण्याआधी यादव यांंनी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. ते राजूरा एसटी डेपोत टिसी पदावर कार्यरत होते. त्यांचा जवळ एक चिठ्ठी आढळून आली असून या चिठ्ठीमध्ये अधिकारी पैश्याच्या मागणी करीता सारखा तगादा लावत असल्याचे म्हटले आहे.
मृतकाची पत्नी रक्षाबंधनाकरिता बाहेर गावी गेली होती. घटनेच्या रात्री त्याने मित्रांसोबत गप्पागोष्टी केल्या. त्यानंतर त्याला आईने जेवन वाढले परंतु नंतर जेवण करतो तू झोप असे म्हणत सर्व झोपी गेले. रात्री त्याने बेडरूम मधील पंख्याला गळफास घेऊन आपले जीवन संपविले. घटनेची माहिती होताच बल्लारपूर पोलीसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर शव विच्छेदना साठी पाठविण्यात आला.
पोलिसांनी केलेल्या तपासात मृतकाच्या खिशात आत्महत्या करीत असल्याची चिट्ठी आढळून आली आहे. त्या चिठ्ठीमध्ये माझ्या मृत्यूला एसटी डेपोतील दोन अधिकारी कारणीभूत असल्याचे लिहिले असल्याची माहिती उघड झाली आहे. डेपोतील ते दोन अधिकारी कोण? कशा करीता लहान कर्मचाऱ्याला  त्रास देत होते. पोलिस प्रशासन कशाप्रकारे कारवाई करणार याकडे एसटी डेपो कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. पोलिसांनी सुसाईड नोट जप्त केली असून पुढील तपास सुरु केला आहे. पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहेत.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

  1. मिलिंद गड्डमवार१६ ऑगस्ट, २०२२ रोजी ८:५२ PM

    मृत व्यक्ती भगवान यादव याने जे अधिकारी त्रास देतात आहे.त्यांची नावे चिठ्ठीत लिहिलेली नाहीत.जीवन संपविण्याआधी एवढे तर ध्यैर्य दाखवायला पाहिजे होते.

    उत्तर द्याहटवा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top