Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: विविध ठिकाणी चोरी व घरफोडी करणाऱ्या आरोपीस अटक
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
विविध ठिकाणी चोरी व घरफोडी करणाऱ्या आरोपीस अटक  गडचांदूर पोलिसांनी केले गजाआड आरोपीकडून फॅशन प्लस मोटरसायकल  जप्त धनराजसिंह शेखावत - आमचा वि...
विविध ठिकाणी चोरी व घरफोडी करणाऱ्या आरोपीस अटक 
गडचांदूर पोलिसांनी केले गजाआड
आरोपीकडून फॅशन प्लस मोटरसायकल  जप्त
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
चोरी, घरफोडी, खून या सारख्या गुन्हे करणाऱ्या कुख्यात व सराईत रेकॉर्डवरील गुन्हेगार संतोष उर्फ बल्ली अंजु दुर्गे वय २९ वर्ष रा. गडचांदुर हा मागील काही दिवसापासून चंद्रपुर जिल्यातील पोलीस स्टेशन बल्लारशा, चंद्रपुर शहर, मुल ईत्यादी ठिकाणी चोरी व घरफोडी सारखे गुन्हे करुन मागील काही दिवसापासुन फरार होता.
२ जुलै रोजी रात्रौ दरम्यान गडचांदूर पोलीसांना गुन्हेगार संतोष उर्फ बल्ली अंजु दुर्गे याचेबाबत गोपनिय माहीती मिळाली. त्या आधारे पोलीस स्टेशन गडचांदूर येथील अधिकारी / अंमलदार यांनी अत्यंत जलदगतीने कर्तव्य तत्परता दाखवुन मिळालेल्या बातमीदारांकडुन माहीतीच्या आधारे गुन्हेगार संतोष उर्फ बल्ली अंजु दुर्गे यास गडचांदूर याला मुक्ती धाम परिसरातून ताब्यात घेतले, तेव्हा त्याचे जवळ एक धारधार चाकु अवैद्यपणे मिळाला असता पोलीसांनी पंचनामा कार्यवाही करुन त्याचे विरुध्द भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंदवुन त्यास अटक केले. सदर आरोपीकडून एक फॅशन प्लस मोटरसायकल पण जप्त केली आहे. नमुद आरोपीने पोलीस स्टेशन गडचांदुर येथे चौकशी दरम्यान सांगीतले की, त्याने पोस्टे चंद्रपुर शहर येथे तिन गुन्हे, पो.स्टे बल्लारशा, मुल येथे चोरी व घरफोडीचे गुन्हे केल्याचे कबुल केले. तसेच नमुद आरोपी कडुन पुन्हा चोरीचे गुन्हे उघडकिस येण्याची शक्यता आहे. 
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक अरविंद साळवे, अपर पोलीस अधिक्षक शेखर देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिलकुमार नायक यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सत्यजित आमले, सपोनि प्रमोद शिंदे, नापोशि धर्मराज मुंडे, पोशि विजय कोटनाके, तिरूपती माने, संदीप थेरे, प्रभु मामीलवाड, महेश चव्हाण यांनी केली.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top