Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: खासदार बाळू धानोरकर यांच्या वाढदिवसा निमित्य सरकार ग्रूप तर्फे अभिष्टचिंतन सोहळा संपन्न
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
खासदार बाळू धानोरकर यांच्या वाढदिवसा निमित्य सरकार ग्रूप तर्फे अभिष्टचिंतन सोहळा संपन्न डी.एस. ख्वाजा - आमचा विदर्भ प्रतिनिधी वरोरा - चंद्रप...
खासदार बाळू धानोरकर यांच्या वाढदिवसा निमित्य सरकार ग्रूप तर्फे अभिष्टचिंतन सोहळा संपन्न
डी.एस. ख्वाजा - आमचा विदर्भ प्रतिनिधी
वरोरा -
चंद्रपूर-आर्णी लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे खासदार बाळू धानोरकर यांच्या वाढदिवसा निमित्ताने अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला, यावेळी  गरीब-गरजू विद्यार्थ्यांना शालेय सामग्रीचे वाटप, शेतकऱ्यांना फवारणी यंत्राचे वाटप, तालुक्यातील जेष्ठ पत्रकारांचा सत्कार, माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. या सोहळ्याचे आयोजन सरकार ग्रूप वरोरा तर्फे करण्यात आले होते. यावेळी या कार्यक्रमाला राजेंद्र चिकटे माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, रविंद्र धोपटे माजी सभापती पंचायत समिती वरोरा, श्रीमती संजिवनी भोयर माजी उपसभापती पंचायत समिती वरोरा, श्रीमती सुनंदा जिवतोडे माजी जि.प.सदस्य, मिलिंद भोयर तालुका अध्यक्ष काँग्रेस कमेटी वरोरा, प्रशांत काळे तालुका अध्यक्ष काँग्रेस भद्रावती, बसंत सिंह सामाजिक कार्यकर्ता, इत्यादी मान्यवर व यावेळी विविध क्षेत्रातील मंडळी, मोठ्या संख्येने मित्रपरिवार आणि सर्वसामान्य नागरिक उपस्थित होते. संचालन डॉ.प्रशांत खुळे यांनी केले, यावेळी प्रमुख मान्यवरांनी खासदार बाळू धानोरकर याना वाढदिवसाच्या शुभेच्छा मनोगतातून दिल्या. खासदार बाळू धानोरकर यांनी सर्वसामान्याचे आभार व्यक्त केले. यावेळी राजेंद्र चिकटे माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरा यांच्या कडून खासदार बाळू धानोरकर यांच्या कार्याचा मनोगतातून गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन सरकार ग्रूप वरोरा चे संस्थापक अध्यक्ष काशिफ खान व त्यांच्या सहकाऱ्यांनी आयोजित केले होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top