Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: विषारी साप चावल्याने विवाहितेचा मृत्यू
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
विषारी साप चावल्याने विवाहितेचा मृत्यू विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी राजुरा - राजुरा तालुक्यातील वरोडा-साखरी गावलागतच्या शांती नगर...
विषारी साप चावल्याने विवाहितेचा मृत्यू
विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
राजुरा तालुक्यातील वरोडा-साखरी गावलागतच्या शांती नगर गावातील एका महिलेचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना घडली. 
सिंधू विकास गायकवाड असे सर्प दंशाने मृत झालेल्या नाव असून तिच्या या दुर्दैवी मृत्यूने सात मुले पोरकी झाली आहे. वरोडा गावाजवळील शांती नगर गावात गायकवाड दाम्पत्य वास्तव्यास आहे. त्यांच्याकडे शेती नसल्याने मोलमजुरी करून पोटाची खळगी भरत आहे. रात्री सिंधू सह विकास हे दाम्पत्य झोपेत असतांना अचानक रात्री ११ वाजताच्या सुमारास सिंधू गायकवाड या ४० वर्षीय महिलेला विषारी सापाने दंश केला लगेच तिला ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले पण तिला मृत घोषित करण्यात आले. तिच्या या दुर्दैवी मृत्यूने सात मुले आईविना पोरकी झाली आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगणाऱ्या या कुटूंबाला शासनाने मदत करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top