Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: मुरमाडी ग्राम पंचायत कुपोषण मुक्तीचा निर्धार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
मुरमाडी ग्राम पंचायत कुपोषण मुक्तीचा निर्धार  बाळूच्या माध्यमातून सरपंच, सचिव व मुख्याध्यापकांचा पुढाकार आमचा विदर्भ - कार्यालय प्रतिनिधी  स...
मुरमाडी ग्राम पंचायत कुपोषण मुक्तीचा निर्धार 
बाळूच्या माध्यमातून सरपंच, सचिव व मुख्याध्यापकांचा पुढाकार
आमचा विदर्भ - कार्यालय प्रतिनिधी 
सिंदेवाही -
आज दिनांक 2 जुलै 2022 ला ग्राम पंचायत मुरमाडी येथे तीन कुपोषित बालकांना "बाळू" बी ए पार्ट ऑफ लविंग युनिट चे संस्थापक अमित महाजनवार यांच्या संकल्पनेतून बाळू पोषण आहार ची किट वाटप करण्यात आली. याप्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य रणधीर दुपारे, सरपंच रत्नावार मॅडम, उपसरपंच, ग्राम पंचायत इतर सदस्य, अंगणवाडी सेविका, सुपरवाजर, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका तन्नीवार मॅडम, सचिव घरडे, बाळू चे कार्यकर्ते तेजेंद्र नागदेवते, सुनील गेडाम, गौतम गेडाम ग्रामसेवक संघटना अध्यक्ष लोणारे उपस्थित होते. 
याप्रसंगी अमित महाजनवार यांनी कुपोषण मुक्तीच्या लढ्यात कुपोषित बालकांना पोषण आहाराची "बाळू" किट देण्याऱ्या  सरपंच रत्नावार मॅडम, जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक तन्नीरवार मॅडम, मुरमाडी चे सचिव घरडे सर्व दानदात्यांचे आभार मानले. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top