Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशन आवारपूर व्दारे स्कूल बॅगचे वाटप
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशन आवारपूर व्दारे स्कूल बॅगचे वाटप  धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी कोरपना - अल्ट्राटेक कम्युनिट...
अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशन आवारपूर व्दारे स्कूल बॅगचे वाटप 
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
कोरपना -
अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशन आवारपूर तर्फे यावर्षी नवीन उपक्रम राबवत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढावी या करीता आदिवासी भागात लक्ष देत असून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजुरगुडा येथील १८ विद्यार्थ्यांना आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कोल्हापूरगुडा येथील ९ विद्यार्थ्यांना स्कुल बँगचे वितरण करण्यात आले. अल्ट्राटेकचे युनीट हेड यांच्या पत्नी सौ. सुधा श्रीराम यांच्या हस्ते राजुरगुडा येथे स्कूल बँग व नोट बुक वितरण करण्यात आले. यावेळी सीमा देवपुरा, पल्लवी घोष, सी.एस.आर. प्रमुख सतीष मिश्रा, सचिन गोवारदीपे, डॉ. गोदावरी नवलानी, संजय ठाकरे व देविदास मांदाळे यांची उपस्थिती होती. तर कोल्हापुरगुडा येथे आवारपूर चे सरपंच प्रियंका दिवे व उपसरपंच बाळकृष्ण काकडे यांच्या हस्ते स्कूल बँग व नोट बुक वितरण करण्यात आले. दोन्ही शाळेच्या शिक्षणकांची उपस्थिती होती. यावेळी सर्व मुलांना चिक्की चे वाटप करण्यात आले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top