Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: मासोळीच्या नादात जीव धोक्यात टाकू नये - ठाणेदार ढाकणे यांचे आवाहन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
मासोळीच्या नादात जीव धोक्यात टाकू नये - ठाणेदार ढाकणे यांचे आवाहन पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने जीवाला धोका होण्याची भीती  धनराजसिंह शेखावत ...
मासोळीच्या नादात जीव धोक्यात टाकू नये - ठाणेदार ढाकणे यांचे आवाहन
पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने जीवाला धोका होण्याची भीती 
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
कोरपना -
वनसडी जवळ असलेल्या पकडीगुड्डम जलाशयावर सतत सात-आठ दिवसापासून होत असलेल्या पावसाने पकडीगुड्डम बांध पूर्णपणे भरून पाणी ओव्हरफ्लो आउटलेट द्वारे बाहेर वाहत आहे. गेल्या दोन दिवसापासून याठिकाणी यात्रेचे स्वरूप आले आहे. परिसरातील अनेक युवक-महिला पकडीगुड्डम जलाशयाच्या सांडव्यावरून वाहणाऱ्या पाण्यातून मासोळी पकडण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहे. काल सायंकाळी ठाणेदार यांनी पोलीस ताफ्यासह भेट देऊन पाहणी केली. यावेळी अनेक लोक मच्छरदाणी जाळे व कापडे आडवे बांधून मासोळी पकडत असल्याचे दिसून आले.  सोशल मीडिया वर व्हीडीओ व्हायरल झाल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची व बघ्यांची गर्दीही झाली. मोठ्या प्रमाणात मासोळीवाहून जात असल्याने शेकडो युवक-महिला वेस्ट वेअर वर दोन दिवसापासून मासोळी गोळा करण्याचे काम मोठ्या प्रमाणात करीत आहे. मात्र पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने जीवाला धोका होण्याची भीती वर्तवली जात आहे, अशी जोखीम घेऊन पाण्यात घुसू नये असे आवाहन कोरपना चे ठाणेदार ढाकणे यांनी केले असून लालसेपायी जीव धोक्यात टाकून जोखीम घेण्याच्या प्रकाराला आला बसावा याकरिता सांडव्यावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top