Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: राजुरा तालुक्याला पुराचा तडाखा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राजुरा तालुक्याला पुराचा तडाखा अनेक मार्ग ठप्प, भडकाम मोहल्ला, देशपांडे वाडी वासियांची धाकधुकी वाढली तालुक्यातील शेकडो हेक्टर पिके पाण्याखाल...
राजुरा तालुक्याला पुराचा तडाखा
अनेक मार्ग ठप्प, भडकाम मोहल्ला, देशपांडे वाडी वासियांची धाकधुकी वाढली
तालुक्यातील शेकडो हेक्टर पिके पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
कोलगाव व चिंचोली बु. गावाला चारही बाजूने पाण्याचा वेढा
साई मंदिर जवळ काही नागरिक गुराढोरांसह अडकले
आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क
राजुरा, वार्ताहर -
राजुरा तालुक्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीने कोलगाव आणि चिंचोली बुज. ही दोन्ही गावे वर्धा नदीच्या पुराने वेढली गेली आहेत. संततधार पावसामुळे शेकडो शेतकऱ्यांच्या शेतातील पिके पाण्याखाली गेले असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. प्रशासन सतर्क असून अन्नधान्यासह सर्व व्यवस्था करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. 
दरम्यान आज राजुरा-चंद्रपूर राज्य मार्गावरील पुलावर चार ते पाच फूट पाणी आहे. या मार्गावर साई मंदिर जवळ काही नागरिक आपल्या गुराढोरांसह अडकून पडले आहेत. प्रशासनाने त्यांना आणण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन टीम पाठवून तेथून आणण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथील लोकांनी आमच्याकडे खाण्यापिण्याचे सर्व साहित्य असून सुरक्षित असल्याचे सांगितले. 
राजुरा-सास्ती मार्गावरील पुलावर सहा ते सात फूट पाणी असून वेकोलिच्या सास्ती, गोवरी कोळसा खाणीकडे जाणारा मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. आजही काही गावात भिंती पडल्याच्या बातम्या आहेत. राजुरा शहरातील देशपांडे वाडी येथील पत्रकार मोहन शर्मा यांच्या घराच्या वॉल कंपाऊंडची भिंत कोसळली आहे.  पाण्याची वाढती पातळी बघता भडकाम मोहल्ला, देशपांडे वाडी वासियांची धाकधुकी वाढली आहे. 
तालुक्यातील कोलगाव या गावाला शिधापत्रिका धारक नागरिकांना नव संजीवनी योजनेअंतर्गत चार महिन्याचे धान्य पुरविले असून तहसीलदार नागरिकांच्या संपर्कात आहे. आरोग्यसंबंधी किंवा अन्य गरज भासल्यास प्रशासन सतर्क असल्याचे तहसीलदार हरीश गाडे यांनी सांगितले आहे.
आता पुन्हा एकदा शेतकरी प्रचंड संकटात सापडला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साठले असून त्यांचे कपाशी व सोयाबीन नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. दुबार पेरणीच्या संकटाला समोर गेलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा अस्मानी संकटाला तोंड द्यावे लागत आहे. नदी व ओढयांना पूर आल्याने सास्ती, कोलगाव, बाबापूर, मानोली, गोवरी, कढोली, चार्ली, निर्ली, धिडशी, मारडा, कुर्ली, जैतापूर, चुनाळा, सातरी, चनाखा, विहिरगाव, मूर्ती, नलफडी, सिंधी, धानोरा, चिंचोली, कविटपेठ,पंचाळा, धानोरा यासह अन्य गावातील शेतात पुराचे पाणी पसरले आहे. गेल्याने पीक पाण्याखाली आले आहे. उभ्या पिकासह शेतजमीन खरवडून जाण्याच्या भीतीनं शेतकरी चिंता व्यक्त करीत आहेत.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top