Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: घर कोसळून वृद्ध महिला जखमी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
घर कोसळून वृद्ध महिला जखमी घुग्घुस भाजपातर्फे तात्काळ मदत  आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क घुग्घुस - परिसरात मागील सात दिवसापासून संततधार पाऊस स...
घर कोसळून वृद्ध महिला जखमी
घुग्घुस भाजपातर्फे तात्काळ मदत 
आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क
घुग्घुस -
परिसरात मागील सात दिवसापासून संततधार पाऊस सुरु असल्याने पौर्णिमा विठ्ठल वाघमारे वार्ड क्र. 1 घुग्घुस या वृद्ध महिलेच्या घराची भिंत गुरुवार 14 जुलै रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास कोसळली वृद्ध महिला घरात असल्याने घराचे कवेलू व लाकडी फाटे तीच्या अंगावर पडले यात ती जखमी झाली तीला लगेच भाजपा कार्यकर्त्यांनी प्रा.आ.केंद्रात उपचारासाठी भर्ती केले.
याबाबत कळताच भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, तलाठी कार्तिक आत्राम, परशुराम पेंदोर, भाजपाचे राजेश मोरपाका, राजू डाकूर यांनी प्रा. आ. केंद्रात जाऊन वृद्ध महिला पौर्णिमा वाघमारे यांची भेट घेतली व विचारपूस केली तसेच घटनास्थळी जाऊन नुकसानग्रस्त घराची पाहाणी केली. भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्याशी भ्रमणध्वनी वरून चर्चा करून याबाबतची माहिती दिली त्यांनी सर्वतोपरी मदत करण्याचे सांगितले व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनी वरून चर्चा केली. तलाठी कार्तिक आत्राम यांनी पंचनामा केला. भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी वाघमारे दाम्पत्यांना जेवणाची व्यवस्था करून दिली तसेच सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. 
आनंद वाघमारे हे वयोवृद्ध असून सकाळी गाय चारण्यासाठी बाहेर गेले होते त्यामुळे ते थोडक्यात बचावले. वाघमारे कुटुंबाची परिस्थिती गरिबीची असल्याने व त्याने कवेलूचे राहते घर कोसळल्याने मोठे नुकसान झाले असून ते बेघर झाले आहे. बेघर झालेल्या वाघमारे कुटुंबियांना राहण्याची पर्यायी व्यवस्था भाजपातर्फे करण्यात येणार आहे. भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी नपचे मुख्याधिकारी यांची भेट घेऊन मदत मिळवून देण्यासाठी चर्चा केली व नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रस्ताव पाठविला आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top