Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: नविन चंद्रपूर म्हाडाच्या गटार योजनेची संरक्षक भिंत पहिल्या पावसात कोसळली
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
नविन चंद्रपूर म्हाडाच्या गटार योजनेची संरक्षक भिंत पहिल्या पावसात कोसळली निकृष्ट कामाचा पुरावा, राजेश बेले यांचा आरोप  उच्च स्तरीय चौकशी समि...
नविन चंद्रपूर म्हाडाच्या गटार योजनेची संरक्षक भिंत पहिल्या पावसात कोसळली
निकृष्ट कामाचा पुरावा, राजेश बेले यांचा आरोप 
उच्च स्तरीय चौकशी समितीचा अहवाल येणार लवकरच
डी.एस. ख्वाजा - आमचा विदर्भ प्रतिनिधी 
चंद्रपूर -
नविन चंद्रपूर म्हाडा परिसरातील ५३ कोटी २९ लाख २२ हजार रुपयांच्या मलनिस्सारण गटार वाहिनी व एसटीपी २४ एमएलडी व ८ एमएलडी या म्हाडा अंतर्गत कामात निकृष्ठ दर्जाची सामग्री वापरण्यात येत आहे. कंत्राटदाराच्या भ्रष्टाचारात सहभागी असल्याने म्हाडाचे अधिकारी निकृष्ट कामाची पाठराखण करीत आहे. अशी तक्रार व उपोषण आंदोलन नंतर उच्च स्तरीय चौकशी समिती गठीत होउन चौकशी करण्यात आली व समितीचा अहवाल येत्या दोन ते तीन दिवसांत येणार असताना पहिल्या पावसात गटार योजनेची संरक्षक भिंत कोसळली आहे. यामुळे योजनेची ‌‌‌‌‌काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे दिसून येत आहे असा आरोप संजीवनी पर्यावरण व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजेश बेले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.
नविन चंद्रपूर म्हाडाच्या गटार योजनेची चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी संजिवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजेश बेले जिल्हाधिकारी कार्यालय समोर अन्नत्याग आंदोलन केले होते. पालकमंत्र्यांनी निर्देश दिल्याने. जिल्हा प्रशासनाने उच्च स्तरीय चौकशी समिती गठीत केली. समितीला १५ दिवसात बेले यांनी आक्षेप घेतलेल्या प्रत्येक मुद्दा बाबत सखोल चौकशी, तपासणी व याबाबत लेखी अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले. हा चौकशी अहवाल येत्या दोन दिवसांत येणार आहे. मात्र पहिल्याच पावसात गटार योजनेची संरक्षक भिंत कोसळली असल्याने कामाचा निकृष्ट दर्जाचा पुरावा समोर आल्याचा आरोप राजेश बेले यांनी केला असून संरक्षक भिंत पडल्याने सदर निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी  राजेश बेले यांनी केली आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top