Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: नांदा फाटा येथे मुख्य रस्त्याच्या मध्यभागी लावले बैरिकेट
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
नांदा फाटा येथे मुख्य रस्त्याच्या मध्यभागी लावले बैरिकेट रस्त्यावर पडले मोठमोठे खड्डे - बांधकाम विभागाचे पूर्णता दुर्लक्ष धनराजसिंह शेखावत -...
नांदा फाटा येथे मुख्य रस्त्याच्या मध्यभागी लावले बैरिकेट
रस्त्यावर पडले मोठमोठे खड्डे - बांधकाम विभागाचे पूर्णता दुर्लक्ष
धनराजसिंह शेखावत -  प्रतिनिधी
गडचांदूर -
गडचांदूर ते नांदा फाटा ह्या रस्त्यावर नांदा फाटा येथे मुख्य रस्त्याच्या मध्यभागी मोठ-मोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. सध्या पावसाळा सुरू असल्याने या खड्ड्यामध्ये एक ते दीड फूट खोल पाणी भरलेले आहे. त्यामुळे लहान वाहनधारकांना अंदाज येत नसल्याने अपघाताची शक्यता वाढलेली आहे. भोयगाव मार्गावरची वाहतूक आवारपुर मार्गे वाढविल्याने या मार्गावर कमालीची वाहनांची रांग धावत असते. विद्यमान आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नाने रस्ता मंजूर होऊन कामाला सुद्धा सुरुवात झाली. मात्र प्रशासकीय कारणे, ठेकेदाराची मनमानी व पावसाळ्याचे दिवस ही कारणे पुढे दाखवत तो रस्ता बीबी शेजारी येऊन थांबला. त्यामुळे बिबि ते आवाळपुर हा रस्ता जैसे थे स्थितीमध्ये राहिल्या कारणाने तो भविष्यात होईल की नाही अशी शंका सामान्यांच्या मनात निर्माण झाली असून कोणत्याही प्रकारचा अपघात घडू नये याकरिता परिसरातील नवयुवकांनी रस्त्याच्या मध्यभागी गतिरोधक म्हणून बॅरिकेट लावल्याचे चित्र बघायला मिळत आहे. त्यामुळे आता तरी सार्वजनिक रस्ते बांधकाम विभाग उपविभाग गडचांदूर यांनी त्वरित रस्त्यावरील खड्डे बुजवावे अशी मागणी स्थानिकांकडून जोरात होत आहे. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top