Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: खासदार बाळू धानोरकर यांनी केला अँड. दीपक चटप यांचा सत्कार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
खासदार बाळू धानोरकर यांनी केला अँड. दीपक चटप यांचा सत्कार धराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदूर - चंद्रपूर-आर्णी-वणी लोकसभा निर्व...
खासदार बाळू धानोरकर यांनी केला अँड. दीपक चटप यांचा सत्कार
धराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
चंद्रपूर-आर्णी-वणी लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे खासदार बाळु उर्फ सुरेश धानोरकर यांच्या वाढदिवसा निमित्त भूमिपुत्र विशेषांक प्रकाशन सोहळ्यात कोरपना तालुक्यातील लखमापूर येथील भूमिपुत्र ॲड. दिपक यादवराव चटप यांची लंडन विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी चेवणींग या जागतिक प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या ४५ लाख रुपये शिष्यवृत्तीचा तो देशातील पहिला तरुण वकील मानकरी ठरला असून त्याची निवड झाल्याबद्दल खासदार बाळु धानोरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी नागपूर विभाग शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्था चंद्रपूर चे अध्यक्ष तथा विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सहकार्यवाह सुधाकरराव अडबाले, चंद्रपूर येथील इन्स्पायर इन्स्टिट्युट चे प्रा. विजय बदखल, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष  प्रा. टिकाराम कोंगरे, उमाकांत धांडे, विनोद दत्तात्रय, प्रा. रवी झाडे, प्रमोद काकडे, डॉ. खान, प्रभाकरराव पारखी व इतर मान्यवर उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top