Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: चोर समजून तरुणाला मारहाण
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
चोर समजून तरुणाला मारहाण आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क भद्रावती - भद्रावती तालक्यातील माजरी येथील वॉर्ड नं.1 येथील एका युवकाला महाराष्ट्र सुरक...
चोर समजून तरुणाला मारहाण
आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क
भद्रावती -
भद्रावती तालक्यातील माजरी येथील वॉर्ड नं.1 येथील एका युवकाला महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानांकडून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. तक्रारीवरून माजरी पोलिस ठाण्यात दोन जवानांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथील स्वाद बारमध्ये वेटरचा काम करणाऱ्या रविंद्रकमार रामप्रसाद केवट (22) हा घटनेच्या दिवशी आपले काम करून रात्री 10.30 वाजता आपल्या घरी गेला. दरम्यान रात्री झोप येत नसल्याने रेल्वे साइडिंगकडे पायी फिरायला घरातून निघाला. त्याचवेळी गस्तीवर असलेले महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या दोन सुरक्षा जवानांनी सदर युवकास तू रात्री कशाला फिरत आहे, अशी विचारपूस केली. त्यातील एक सुरक्षा जवानाने लगेच काठीने त्याला मारहाण सुरू केली. त्यावेळेस युवकाने मला कशाला मारहाण करता, अशी विचारणा करीत असतांना सदर जवानांनी काही न ऐकता शिविगाळ करत बेकयदेशीररित्या लाठी-काठीने बेदम मारहाण केली.
दरम्यान सुरक्षा जवानांनी पेट्रोलिंगची गाडी बोलावून त्याला गाडीत बसविले. त्या गाडीत बसलेले इतर जवान त्या युवकास पुन्हा मारण्याची चर्चा करत होते. दरम्यान सदर युवक संधी साधून सुरक्षा जवानांच्या ताब्यातून पळून गेला. या मारहाणीत युवक गंभीर जखमी झाला आहे. याप्रकारणी रवींद्रकुमार केवट हा रविवारी पोलिस स्टेशन गाठून महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानांविरुद्ध तक्रार दिली. फिर्यादीच्या तक्रारीवरून माजरी पोलिसांनी महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या प्रशांत सुरडकर, प्रभुदास राठोड यांच्याविरुद्ध 323,504, भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास ठाणेदार यांच्या मार्गदर्शनात सपोनि अजितसिंग देवरे करीत आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top