Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: मोठी बातमी - पेट्रोल 9.50, डिझेल 7 रुपयांनी झाले स्वस्त
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
मोठी बातमी - पेट्रोल 9.50 तर डिझेल 7 रुपयांनी होणार स्वस्त मोदी सरकारचा मोठा निर्णय, अर्थमंत्र्यांची घोषणा आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स नव...
  • मोठी बातमी - पेट्रोल 9.50 तर डिझेल 7 रुपयांनी होणार स्वस्त
  • मोदी सरकारचा मोठा निर्णय, अर्थमंत्र्यांची घोषणा
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
नवी दिल्ली -
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी कर कमी करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पेट्रोलचा दर 9.50 पैसे आणि डिझेलचे दर 7 रुपयांनी कमी होणार आहे. करोनाचं संकट, रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्ध यामुळं निर्माण झालेली स्थिती, महागाईचा फटका यातून नागरिकांना दिलासा मिळावा म्हणून केंद्र सरकारनं कर कमी केले आहेत. केंद्र सरकारनं गेल्या वर्षी देखील पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करण्याची घोषणा केली होती. याशिवाय १२ सिलेंडरवर २०० रुपयांचं अनुदान देण्यात येणार असल्याचं देखील निर्मला सीतारमण यांनी जाहीर केलं आहे. यामुळं केंद्र सरकारला ६ हजार कोटी रुपयांचं नुकसान होणार आहे. केंद्र सरकारच्या निर्णयानंतर राज्य सरकारांनी देखील कर कमी करावेत, असं आवाहन सीतारमण यांनी केलं आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यांनी कर कमी केले नव्हते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top