Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: अज्ञात वाहनाच्या धडकेत सायकलस्वार ठार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अज्ञात वाहनाच्या धडकेत सायकलस्वार ठार आमचा विदर्भ - ब्यूरो रिपोर्ट्स  ब्रह्मपुरी - पत्नीला माहेरी सोडण्यासाठी गेलेल्या पतीचा परतीत अपघात होऊ...

  • अज्ञात वाहनाच्या धडकेत सायकलस्वार ठार
आमचा विदर्भ - ब्यूरो रिपोर्ट्स 
ब्रह्मपुरी -
पत्नीला माहेरी सोडण्यासाठी गेलेल्या पतीचा परतीत अपघात होऊन मृत्यू झाला. चंद्रशेखर उर्फ प्रफुल वासुदेव घुटके वय वय 29 वर्षे रा. मालडोंगरी असे मृतक युवकाचे नाव आहे.  
मृतक युवकाचे वीस दिवसापूर्वी लग्न झाले होते. तो पत्नीला माहेरी सोडण्यासाठी गेला व पत्नीला माहेरी सोडून मित्राच्या मुलाच्या वाढदिवस कार्यक्रमासाठी गेला वाढदिवसाचा कार्यक्रम आटोपून तो मालडोंगरीला परत येत असताना ब्रह्मपुरी-नागभीड राष्ट्रीय मार्गावरील किरमटी मेंढा गावाजवळ अज्ञात वाहनाने सायकलला धडक दिली यात गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी ब्रह्मपुरी येथील आस्था हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सदर युवक ब्रह्मपुरी येथील डॉक्टर गणवीर यांच्या दवाखान्यात खाजगी नोकरी करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top