आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
चंद्रपूर/घुगुस -
दिनांक 30 एप्रिल 2022 रोजी घुगुस पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बेलोरा पुलियाच्या खाली एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला. घुगुस पोलीस स्टेशनचे ठाणेदार घटनास्थळी पोहोचून या प्रकरणाचा पंचनामा करून बॉडीला उत्तरीय तपासणीकरिता चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालय येथे पाठवण्यात आले. मृत्यू पावलेला ईसम चंद्रपूर शहरातील हिंगलाज भवानी वॉर्ड जुनोना रोड बाबुपेठ येथील रहिवासी आहे. असे सूत्राकडून कळले. मृत इसम हा पाच दिवसापासून बेपत्ता असल्याने मृतकाची पत्नी सुनीता पवन रंगारी हीने पोलिस स्टेशन रामनगर येथे बेपत्ता असल्याबाबत रिपोर्ट दाखल केली होती. सतत शोधाशोध घेत असताना एका अनोळखी इसमाची बॉडी घुगुस पोलीस स्टेशन हद्दी मध्ये अनोळखी इसमाची बॉडी मिळाल्याची वार्ता मिळताच. मृत्तकाची पत्नी व भाऊ हे जाऊन बॉडी सनागत करून हे माझे भाऊ आहे असे सांगण्यात आले.
मृतकाचे रिश्तेदार भाऊ, बहीण, वहिनी व इतर नातेवाईक पवन चा घातपात झाल्याची शंका व्यक्त करीत आहे. पोलीस या प्रकरणात काय छडा लावते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.