Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने संजय गांधी निराधार योजनेचे प्रमाणपत्र वितरण
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने संजय गांधी निराधार योजनेचे प्रमाणपत्र वितरण शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - पात्र लाभार्थांना शासना...

  • यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने संजय गांधी निराधार योजनेचे प्रमाणपत्र वितरण
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
पात्र लाभार्थांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवुन देण्यासाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने सातत्याने प्रयत्न केल्या जात असुन हजारो नागरिकांना यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने या योजनांचा लाभ मिळवून देण्यात आला आहे. दरम्यान आज यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयात 25 नागरिकांना संजय गांधी निराधार योजने अंतर्गत येणाऱ्या विविध योजनांचे प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, यंग चांदा ब्रिगेडचे महानगर जिल्हाध्यक्ष पंकज गुप्ता, यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, अल्पसंख्यांक विभागाचे युथ शहराध्यक्ष राशेद हुसेन, विश्वजित शाहा, विलास सोमलवार, करणसिंह बैस, तापोष डे, नितीन शाहा, देवा कुंटा, राम जंगम, नरेश आत्राम, रुपेश मुलकावार, सिध्दार्थ मेश्राम, अजय मेश्राम, महेश चहारे, अनिरुध्द धवने, चंद्रशेखर देशमुख, दुर्गा वैरागडे आदिंची उपस्थिती होती.
मतदार संघातील पात्र नागरिकांना विविध शासकिय योजनांचा लाभ मिळावा या करिता यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना केल्या होत्या. त्या नुसार यंग चांदा ब्रिगेडचे कार्यकर्ते सातत्याने प्रयत्न करत आहेत. आज घडीला यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातुन हजारो नागरिकांना सदर योजनांचा लाभ मिळवून देण्यात आला आहे. यात संजय गांधी निराधार योजने अंतर्गत येणा-र्या श्रावणबाळ, परितक्त्या, विधवा निवृत्ती पंेशन योजना, अपंग निवृत्ती पेंशन योजना, यासह इतर शासकिय योजनांचा समावेश आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top