Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: रामसेतू पुलाच्या खाली मिळाले त्या युवतीचे शीर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
रामसेतू पुलाच्या खाली मिळाले त्या युवतीचे शीर भद्रावती येथील शिर नसलेल्या निर्वस्त्र युवती हत्या प्रकरण अपमानाचा बदला घेण्यासाठी मैत्रिनेचे ...

  • रामसेतू पुलाच्या खाली मिळाले त्या युवतीचे शीर
  • भद्रावती येथील शिर नसलेल्या निर्वस्त्र युवती हत्या प्रकरण
  • अपमानाचा बदला घेण्यासाठी मैत्रिनेचे केला मैत्रिणीचा घात
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
चंद्रपूर -
शीर नसलेल्या 22 वर्षीय तरुणीच्या मृतदेहाच्या रहस्यमयी प्रकरणात अनेक नवीन बाबी पुढे येत असून सदर प्रकरणात अल्पवयीन मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अपमानाचा बदला घेण्यासाठी सदर हत्याकांड घडवून आणले अशी कबुली अल्पवयीन मुलीने दिली आहे. दुपारच्या सुमारास दाताला मार्गावरील रामसेतू पुलाच्या खालील भागात सदर युवतीचे शीर मिळाले. आरोपीने त्या जागेवर शीर फेकले असल्याचे सांगताच स्थानिक गुन्हे शाखेने 2 गोताखोरांच्या मदतीने सदर शीर शोधून काढले. कापडाच्या थैलीत असलेले शिर ओढणीने व अनेक कपड्यांच्या गुलदस्त्यात बांधून त्या पुलावरून खाली फेकले असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणात अनेकांनी मत मूलींचे मूळ फोटो समाजमाध्य व्हायरल केले होते. युवतीचा मूळ फोटो व नाव सार्वजनिक केले. मतक युवतीला नेणारा तो युवक कोण? चंद्रपुरातील प्रतिष्ठित घराण्याचा किंवा राजकीय पार्श्वभूमी असलेला युवक तर नाही अशी चर्चा शहरात जोमात सुरू आहे.स्थानिक गुन्हे शाखा व सायबर सेल ने या प्रकरणात उत्तम कामगिरी बजावीत तात्काळ आव्हानात्मक गुन्ह्याचा उलगडा भद्रावती पोलिसांच्या चमूने शीर ताब्यात घेत पुढील तपास केला.

सविस्तर वृत्तांकन या बातमीत वाचा....
⭕ भद्रावती येथील शिर नसलेल्या निर्वस्त्र युवतीच्या हत्येचे कारण आले पुढे

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top